Market Bulletin: सोयाबीन दरात वाढमागील आठवडाभरात सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. सोयाबीनची बाजारातील आवक कमी झालेली आहे. सोयापेंड आणि सोयातेलाला उठाव असल्याने सोयाबीनच्या भावातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे भाव काहीसे सुधारले आहेत. सोयाबीनला सध्या बाजारात ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन सोयाबीन खरेदीचे भाव ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसातील वाढ टिकूनदेशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा टिकून आहे. देशात चालू आठवड्यातही देशातील बाजारात सुधारणा दिसून आली. तर चालू हंगामातील उच्चांकी भाव सध्या कापसाला मिळत आहे. कापसाचा भाव खुल्या बाजारात सध्या ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाला उठाव चांगला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव हंगामातील उचांकी ८० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहे. सीसीआयही कापसाची विक्री वाढीव दराने करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वाढल्याने देशातही भाव वाढले आहेत. .Tendu Patta Price: तेंदूपत्ता दरात यंदा ७५० रुपयांची वाढ.कांदा दबावातचदेशातील बाजारात कांद्याचा भाव दबावातच आहे. बाजारातली सध्या कांद्याची आवक चांगली सुरु आहे. निर्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच होत आहे. आखाती देशांना निर्यात ठप्प झाली आहे. वाढत्या उन्हामुळे काही भागात कांदा पिकाला उष्णतेचा फटका बसत आहे. त्यात ढगाळ हवामानाचाही पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना या सर्व कारणांमुळे बाजारात कांदा विकावा लागत आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने दरावर दबाव आला आहे. सध्या कांदा ५०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. आवकेचा दबाव पुढील काही आठवडे राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे भावावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर.काकडीला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीची आवक चांगली आहे. मात्र दुसरीकडे काकडीला उठावही चांगला आहे. यामुळे काकडीचे दर टिकून आहेत. काही बाजारांमध्ये काकडीची आवक कमी झाल्याने दरातही सुधारणा दिसून आली आहे. मात्र राज्यातील सरासरी दर काहीसे स्थिर दिसत आहेत. सध्या काकडी प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. काकडीला पुढील काळातही चांगला उठाव मिळणार आहे. पण बाजारातील काकडीची आवक काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार भावाला मिळेल, असा अंदाज काकडी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .सरकीचा उठाव कायमदेशातील बाजारात मागील काही महीनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळत आहे. सध्या सरकी बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होत आहे. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.