Market Bulletin: कापसातील तेजी कायमदेशातील बाजारात कापसाचा भाव तेजीतच आहे. कापसाला मागणी वाढल्याने भावाला आधार मिळत आहे. काही बाजारांमध्ये उच्चांकी १० हजारांचा भाव दिसत असला तरी सरासरी भावपातळी ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. युध्दामुळे पाॅलिस्टरच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. पाॅलिस्टरचे भाव वाढल्याने कापड निर्मितीसाठी कापसाला मागणी येत आहे. यामुळे भावात वाढ झाली आहे. कापसाच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकूनसोयाबीनच्या भावातील तेजीही टिकून आहे. सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात वाढ झाल्याने सोयाबीनच्या भावालाही चांगलाच आधार मिळाला आहे. सोयाबीनला बाजारात सध्या चांगला उठाव आहे. तर देशातील उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारातील आवक कमी झालेली आहे. यामुळे सोयाबीनच्या भावात वाढ झालेली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ६ हजार १०० ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनच्या भावातील तेजी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Sugarcane FRP Hike: ‘एफआरपी’त वाढीने दिलासा कुणाला?.कांदा भाव दबावातदेशातील बाजारात कांदा भाव दबावात आहेत. कांद्याचा सरासरी भाव बहुतांशी बाजारांमध्ये १ हजारांच्याही खाली गेला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याला बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी १०० रुपये प्रतिक्विंटलपासून भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक सध्या वाढलेली आहे. तर बाजारातील सरासरी भावपातळी प्रतिक्विंटल ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कांद्याची आवक पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: कापूस तेजीत; सोयाबीन ६५०० रुपयांवर, मका भाव स्थिर, भेंडी आवक टिकून तर लिंबाला उठाव.डाळिंब आवक कमीराज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता कमी आहे. यामुळे डाळिंबाचा भाव सध्या टिकून आहे. डाळिंबाला बाजारात सध्या गुणवत्तेप्रमाण ६ हजारांपासून ते सरासरी १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे. काही बाजारांमध्ये उच्चांकी १६ ते २० हजारांचा भाव दिसत आहे. पण हा भाव गुणवत्तापूर्ण मालाला मिळत आहे. इतर माल १० हजारांच्या खालीच विकला जात आहे. तरीही कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दर टिकून आहे. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज डाळिंबा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..पपईला उठावपपईला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे पपईला पसंती मिळत आहे. दुसरीकडे पपईची बाजारातील आवकही काही दिवसांमध्ये सुधारलेली आहे. याचा दरावर काहीसा परिणाम दिसून आला. सध्या पपईला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते १८०० रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे. पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.