Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारसोयाबीनच्या भावात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी काहीसे चढ उतार पाहायला मिळाले. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५० ते १०० रुपयांनी नरमले होते. आज प्रक्रिया प्लांट्सनी ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयाने सोयाबीनची खरेदी केली. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे. सोयाबीनचा भाव आज ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहीला. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील काहीसे चढ उतार वगळता भावपातळी स्थिर राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस दबावातचदेशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे दबावातच आहेत. कापसाची बाजारातील आवकही काहीशी अधिक दिसत आहे. सीसीआयची कापसाची विक्री कमीच होताना दिसत आहे. यामुळे सीसीआय कापूस विक्रीचे भाव आणखी कमी करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कापसाला आज सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. पण सीसीआयची कापसाची विक्री आणि आयातीचा दबाव राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Soybean Price: लातूरमध्ये सोयाबीनदर हमीभावाच्या पुढे .कांदा भाव नरमलेकांद्याच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली. कांद्याची बाजारातील आवक आज अधिक होती. नाशिक जिल्ह्यातील येवला, आंदरसूल, मनमाड, पिंपळगाव बसवंत बाजारातील आवक वाढलेली होती. तसेच नाशिक आणि नगर जिल्ह्यातील बाजारांमध्येही आवकेचा दबाव होता. कांद्याचा सरासरी बाजारभाव बहुतांशी बाजारांमध्ये एक हजारांच्या दरम्यान पोचला. तर कमाल भाव १३०० ते १५०० रुपये होता. किमान भाव अगदी १०० रुपयांपासून सुरु असल्याचे दिसते. कांदा बाजारातील आवक कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Lemon Price: उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर तेजीत.हळदीचा भाव टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव टिकून आहेत. बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा काहीशी कमीच आहे. पण हळदीला चांगलाच उठाव आहे. यामुळे दरपातळी टिकून आहे. हळदीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १४ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचे दरही टिकून राहू शकतात, अशा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .गवारचा भाव तेजीतच राज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून गवारचा भाव तेजीतच आहे. आजही राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये गवारची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात तूर गुणवत्तेनुसार सरासरी ६ हजार ते ७ हजाराने विकली जात आहे. राज्यातील अनेक भागात गवारचे पीक आहे. त्यामुळे पुढील काही काळ बाजारातील आवक कमीच राहून गवारचे भाव टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.