Market Bulletin: सोयाबीनचे भाव टिकूनराज्यात सोयाबीन बाजारात आवक कमीच आहे. तर सोयाबीनला मागणीही चांगली आहेत. राज्यातील प्रक्रिया प्लांट्सचे खरेदी दर ५ हजार ६०० ते ६ हजारांच्या दरम्यान आहेत. तर खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांचा दर मिळत आहेत. सोयाबीनची आवक पुढील काळात कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन दर टिकून राहतील, अशी शक्यता सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे..कापूस बाजारात चढ-उतारदेशातील कापूस बाजारात मागील दोन आठवडे दरात वाढ झाली. परंतु आता कापूस बाजारात मागील चार दिवसांपासून चढ-उतार सुरु आहेत. बहुतांश बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत. तर काही भागात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सीसीआय बाजारात कापसाची विक्री करत आहे. सध्या बाजारात कापूस ७ हजार ९०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तसेच सरकारने अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या आयातीवरील शुल्क काढले आहे. त्यामुळे कापूस बाजारात चढ-उतार होत आहेत. पुढील काही दिवस कापूस दरात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Silk Cocoons: नऊ दिवसांत साडेचारशे क्विंटलवर रेशीम कोषांची आवक.आल्याला उठाव टिकूनमागील आठवड्यापासून आल्याला बाजारात उठाव टिकून आहे. सध्या बाजारात आल्याची आवक सरासरीएवढीच असल्याने आल्याचे दर स्थिर आहेत.राज्यात आल्याला सरासरी प्रति क्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपये दर मिळत आहेत. आज दुपारपर्यंत मुंबई बाजारात आल्याची सर्वाधिक १ हजार ७५१ क्विंटल आवक झाली. तर प्रमुख बाजारात आवक कमीच आहे. यंदाच्या हंगामात आले पिकाला पावसाचा तडाखा बसल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे बाजारातील एकूण आवक तुलनेने कमी राहिली, आणि त्याचा परिणाम म्हणून आल्याला उठाव टिकून आहे. राज्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढ होत आहे. आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. आल्याला उठाव मात्र पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे आल्याच्या भावालाही चांगला आधार राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Watermelon Price 2026: खानदेशात कलिंगडाला जागेवर २० ते २२ रुपये दर.भेंडीला मागणीचा आधारराज्यातील मुंबई बाजार वगळता बाजारात भेंडीची आवक कमीच आहे. परंतु भेंडीला मागणीचा आधार मिळत आहे. त्यामुळे उठाव चांगला आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भेंडी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात. सध्या बाजारात सरासरी प्रति क्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपयांचा दर मिळत आहे. राज्यातील मुंबई बाजारात सर्वाधिक १ हजार ११२ क्विंटल भेंडीची आवक झाली. पुढील काळात भेंडीची आवक कमी राहून दराला आधार टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..कलिंगडाची आवक कमीचराज्यातील प्रमुख बाजारात कलिंगडाची आवक कमी आहे. परंतु कलिंगडाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कलिंगडाचे दर टिकून आहेत. कलिंगड पिकाला ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे कलिंगडाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात चांगल्या गुणवत्तेच्या कलिंगडाला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ९०० ते २ हजार रुपयांचा दर मिळत आहे. पुढील दोन आठवड्यात कलिंगडाची आवक काहीशी वाढण्याची शक्यता आहे. परंतु राज्यात तापमानाचा पारा हळूहळू चढू लागला आहे. त्यामुळे कलिंगडाला उठाव टिकून राहील. परिणामी बाजारातील दर टिकून राहतील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.