Agrowon Podcast : तुरीच्या भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हरभऱ्याचे आजचे दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, मोसंबी आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज काहिशी सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे वाढून ९.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावाती नरमाई कायम आहे. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसातील चढ उतार कायम

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे कालच्या तुलनेत वाढले होते. तर देशातील बाजारात आज भाव काहिसे कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७१.२२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : कांद्याचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे तीळ दर?

तुरीचा भाव नरमला

तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून काहिसा कमी झाला आहे. तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता. तसेच आयातही सुरु आहे. नवा माल पुढील महिन्यापासून काही बाजारात सुरु होईल. याचा दबाव दरावर आला. सणांची मागणी असूनही तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. तुरीचा सरासरी भाव ९ हजार ते ९ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Soybean Market : हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नका; आजपासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरु; ओलाव्याची अडचण

मोसंबीचे भाव नरमले

मोसंबीचा नवा हंगाम आता सुरु झाला. बाजारात नव्या मोसंबीचा माल सुरु झाला आहे. पण नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील मोसंबी पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मोसंबी पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. गुणवत्ताही खालवली. यामुळे मोसंबीच्या भावावर दबाव आला. सध्या मोसंबीला ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मोसंबीची आवक पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने नुकसान झाल्याने गुवत्तापूर्ण मोसंबीला चांगले मार्केट राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हरभरा भाव नरमले

हरभऱ्याच्या भावातही काहिशी नरमाई आली आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला होता. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पण सरकारच्या दबावामुळे आणि स्वस्त वाटाण्यामुळे हरभरा भावावर काहिसा दबाव आला आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दुसरीकडे हरभऱ्याला सणांमुळे मागणी आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com