Market Bulletin: कांद्याचे भाव दबावातचदेशातील बाजारात कांद्याचे भाव दबावातच आहेत. कांद्याला सध्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील कांद्याची आवक सध्या चांगली आहे. कांद्याची टिकवणक्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. सध्या बाजारात कांदा ११०० ते १३०० रुपये सरासरी दराने विकला जात आहे. कमाल दर १८०० रुपये आणि किमान दर ५०० रुपये दिसत आहे. सोलापूर, नाशिक जिल्ह्यातील नाशिक, लासलगाव, मालेगाव, साटाणा, पिंपळगाव बसवंत, उराणे, तसेच पुणे, अहिल्यानगर, घोडेगाव, साक्री या बाजारांमध्ये कांद्याची आवक चांगली आहे. पुढील काही आठवडे कांदा दरातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .लसूण दरात सुधारणालसणाच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहिशी सुधारणा दिसून आली. ऑगस्ट महिन्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. लसूण उत्पादक राज्यांमध्येही पिकाला फटका बसला. तसेच बाजारातील आवकेवरही परिणाम झाला. बाजारांमधील लसणाची आवक कमी झाल्याने दराला आधार मिळाला, असे व्यापारी सांगत आहेत. दुसरीकडे सणासुदीच्या दिवसांत लसणाला चांगली मागणी आहे. सध्या लसूण ६ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील २ महीने बाजारात लसणाला चांगली मागणी राहील. नवा माल बाजारात येईपर्यंत दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. .Solapur Market: सोलापुरात सीताफळाला उठाव.मोसंबीचे दर कमीचराज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये मोसंबीचे दर सध्या दबावातच दिसत आहेत. पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे मोसंबीला उठाव कमी मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये मोसंबीची आवक चांगली आहे. तसेच मुंबई बाजारातही मोसंबीची आवक जास्त आहे. त्यातच सध्याच्या वातावरणात मोसंबीला कमी उठाव मिळत असल्याने दरपातळी १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. यंदा अतिपावसाचा आणि पावसातील खंडाचा पिकाला फटका बसत आहे. मोसंबी पिकाची गुणवत्ता कमी झाल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. मोसंबीचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. .Onion Stock Inspection: कांदा साठा तपासणीसाठी पुन्हा केंद्राचे पथक दाखल.तुरीतील मंदी कायमदेशातील बाजारात तुरीचे दर दबावातच आहेत. आयातीमुळे देशात तुरीचा स्टाॅक तयार झाला. परिणामी पुरवठा जास्त असल्याने दरात मंदी आली आहे. तुरीचा हमीभाव ८ हजार रुपये असताना बाजारात सध्या तुरीला सरासरी ६ हजार रुपये दर मिळत आहे. तूर आयात सुरुच आहे. तसेच सरकारने आणखी ६ महिन्यांसाठी तूर आयात खुली केली आहे. त्यामुळे तुरीची आयात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. परिणामी देशातील उत्पादन कमी होऊनही तुरीच्या दरावर दबाव आहे. तुरीच्या बाजारावर सरकारच्या धोरणांचा दबाव आहे. त्यामुळे तुरीचे दर दबावातच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .ज्वारीचे दर स्थिर मागील दोन महिन्यांपासून बाजारात ज्वारीचे दर स्थिर दिसत आहेत. ज्वारीला बाजारात चांगली मागणी आहे. तर दुसरीकडे ज्वारीची आवकही चांगली आहे. ज्वारीची खऱिपातील लागवडही चांगली आहे. परिणामी दर स्थिरावले आहेत. सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार २ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाही. बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी केली जात आहे. ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.