Market Bulletin: सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज टिकून होता. शुक्रवारपर्यंत मोठी घट झाल्यानंतर शनिवारी बाजारात सुधारणा झाली होती. आजही प्रक्रिया प्लांट्सचा सोयाबीन खरेदीचा भाव ७ हजारांच्या दरम्यान होता. प्रक्रिया प्लांट्सनी ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली होती. तर बाजार समित्यांमध्ये आज भाव सुधारायला सुरुवात झाली होती. अनेक बाजारांमध्ये भावात २०० रुपयांपर्यंत वाढ दिसून आली. आज सोयाबीन सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकले गेले. पुढील काही दिवस सोयाबीन भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस दरात कपातआंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव एका पातळीच्या दरम्यान स्थिर आहे. मात्र देशात कापसाच्या भावात घट सुरुच आहे. काॅटन काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने आज कापूस खरेदीच्या भावात खंडीमागे २५०० रुपयांची कपात केली होती. बाजारातील आवक मात्र कमीच आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला ८ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. रुपईच्या भावात काहीसे चढ उतार होत असले तरी सरकीचे भाव टिकून आहे. सरकी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दमरम्यान विकला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरातील स्थिरता आणि देशातील कमी आवक यामुळे पुढील काळात कापूस दर स्थिरावू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Global Fertilizer Shortage: खत तुटवड्याचा जागतिक धान्य उत्पादनावर परिणाम शक्य.मका भाव स्थिरमक्याच्या भावात मागील महीनाभरात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची सुधारणा दिसून आली. सोयापेंडचे भाव वाढल्याने मक्याला उठाव वाढला आहे. तर नविन हंगामात कमी पावसामुळे मका लागवड कमी होण्याची शक्यता आहे. खरिपातील उत्पादनात घटीची शक्यता असल्याने मक्याला आधार मिळत आहे. सध्या बाजारात मका प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारात सध्या उन्हाळी मक्याची आवक काही ठिकाणी सुरु आहे. पण बहुतांशी बाजारांमधील आवक कमी झालेली आहे. पुढील काळात मक्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचाही आधार मक्याच्या भावाला मिळेल, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Amravati Mango Market: अमरावतीत आंब्याची आवक पोहोचली एक हजार क्विंटलवर.हिरवी मिरची सुधारलीहिरव्या मिरचीच्या भागात मागील दोन ते तीन आठवड्यांपासून सुधाऱणा दिसून येत आहे. बाजारातील मिरचीची आवक कमी झाली आहे. तर मिरचीला उठाव चांगला आहे. त्यामुळे बाजारात मिरची गुणवत्तेप्रमाणे ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. मिरची पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला आहे. तर अनेक भागात पिकाला पाण्याचाही ताण बसला आहे. यामुळे हिरव्या मिरचीचा भाव सुधारला आहे. हिरव्या मिरचीची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे बाजारात व्यापारी आणि जाणकार शेतकरी सांगत आहेत. .आंबा दर टिकूनराज्यातील बाजारात आंब्याचा भाव सध्या टिकून आहे. मागील काही दिवसांमध्ये काही बाजारांमधील आंब्याची आवक कमी झालेली आहे. बाजारात आंब्याला गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. तोतापुरी आंबा २ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहे. तर हापूस १६ ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. इतर जातीच्या आंब्याला गुणवत्तेनुसार ५ हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंब्याची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आंब्याच्या भावाला आधार मिळेल, असे जाणकार सांगत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.