Market Bulletin: कापूस भाव टिकूनदेशातील कापसाला मागणी कायम आहे. तर बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील तेजीही टिकून आहे. कापसाला सध्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ५०० ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील कापसाची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. सुत आणि रुईला उठाव आहेच. शिवाय सरकीचे भाव टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव वाढलेला आहे. यामुळे कापसाचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन तेजीतसोयाबीनच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे. तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. याचा आधार दराला मिळत आहे. सोयाबीनच्या भावातील तेजी मागणी दोन आठवड्यांपासून कायम आहे. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ६ हजार १०० ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनच्या भावातील तेजी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..APMC Facilities Issue: हळदीच्या आवकेत वाढ, मोजमापासाठी जागा अपुरी.मका भाव स्थिरावलादेशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून मक्याचा भाव दबावातच आहे. बाजारातील मक्याची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव मात्र कमी आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. सरासरी मक्याची दरपातळी सध्या १६०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. बाजारातील मक्याची आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे. तर मक्याचा भाव स्थिरावलेला असल्याचा दबाव दराव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याचा भाव या पातळीच्या दरम्यान पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: कांदा भाव दबावात; कापसातील तेजी कायम, सोयाबीन टिकून, डाळिंब आवक कमी तर पपईला उठाव.हळदीचे भाव टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसत आहे. सध्या बाजारात हळद प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारात आवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.