Market Bulletin: सोयाबीनची आवक मंदावलीदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव सध्या स्थिरावला आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला उठाव चांगला आहे. यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार आहे. सध्या बाजारात सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. देशात सध्या सोयाबीनचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारातील सोयाबीनची आक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा दराला आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस आवक स्थिरदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक काहिशी स्थिरावली आहे. तर कापसाला उठाव चांगला आहे. निर्यातीसाठीही मागणी येत असल्याची सध्या बाजारात चर्चा आहे. त्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Hapus Mango Price: हापूसला पाच ते सात हजार रुपये दर.मका भाव दबावातचदेशातील बाजारात मक्याचा भाव दबावातच आहे. मक्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते १ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. रब्बीतील आवकही चांगली राहण्याची शक्यता आहे. देशातील मका उत्पादन यंदा वाढले आहे. यामुळे आवकेचा दबाव दिसून येत आहे. मक्याला सध्या उठाव काहिसी वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण उत्पादनही चांगले असल्याने दरपातळी काही दिवस स्थिर दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Ethanol Blending: इथेनॉल ब्लेंडिंग वाढविण्याचे सरकारला आवाहन.गहू आवक सुधारलीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गव्हाची आवक वाढत आहे. गहू काढणीला वेग येत असून अनेक बाजारातील आवक वाढलेली आहे. यंदा गव्हाचे उत्पादनही चांगले आहे. यंदा देशात विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. अवकेचा दबाव वाढत असल्याने गव्हाचे भावही नरमले आहेत. सध्या गव्हाला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाची बाजारातील आवक पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या भावावरील दबावही टिकून राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .तूर स्थिरावलीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव स्थिरावला आहे. तुरीची आवक कमी झालेली आहे. तर यंदाही उत्पादन कमीच आहे. आयातही सध्या युध्दामुळे काहीशी प्रभावित झाली आहे. मात्र पुढील काळातही आयात होण्याची शक्यता कायम आहे. यामुळे तुरीचा भाव देशातील बाजारात स्थिरावला आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आवक पुढील काळात काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.