Market Bulletin:ज्वारीचे दर दबावातचराज्यातील बाजारात ज्वारीचे दर दबावातच आहेत. गेल्या वर्षभरात ज्वारीचे उत्पादन वाढले होते. तसेच सरकारच्या धोरणामुळे धान्याचे भाव कमीच राहीले. याचा दबाव ज्वारीच्या दरावर दिसून येत आहे. रब्बी ज्वारी बाजारात आल्यापासून दर स्थिर दिसत आहेत. मागील २ महिन्यांपासून बाजारात ज्वारीला सरासरी २६०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. चालू खरिपातही ज्वारीची लागवड सरासरी झाली आहे. पण पावसाचा पिकाला फटका बसत आहे. परंतू पुढील काही आठवडे बाजारातील ज्वारीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे, असे जाणकार सांगत आहेत. .डाळिंब तेजीतचसध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे. डाळिंब पिकाला मागील दोन महिन्यांपासून सातत्याने पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे बाजारातील गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी झाली आहे. सध्या गुणवत्तापूर्ण माल मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत आह. सध्या बाजारात डाळिंब ७ हजार ९ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे. तर गुणवत्तापूर्ण मलाला १२ हजारांपर्यंत दर मिळत आहे. पुणे आणि मुंबई बाजारात डाळिंब १० बाजारांपुढेही विकले जात आहे. डाळिंब पिकावर पुढील काळातही पावसाचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे बाजारातील गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच राहून दर टिकून राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला..Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर.पपईला चांगला उठावराज्यातील बाजरात पपईची आवक स्थिर आहे. तर दुसरीकडे पपईला उठावही मिळत आहे. त्यामुळे पपईचे दर स्थिर दिसत आहेत. पावसाचा पपईच्या आवकेवरही परिणाम दिसत आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक आणि अमरावती बाजारात चांगली आवक दिसत आहे. त्यातही मुंबई आणि पुणे बाजारातील आवक जास्त आहे. सध्या पपई प्रतिक्विंटल सरासरी १७०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान विकाली जात आहे. पपई पिकाला पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील, असा अंदाज पपई बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Onion MSP Demand: कांद्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी.मक्याचा बाजार स्थिरमक्याच्या भावात मागील काही दिवसांपासून १०० रुपयांपर्यंत चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळीत फारसा फरक दिसला नाही. बाजारातील मक्याची आवकही स्थिर दिसत आहे. सध्या मका २१०० ते २३०० रुपयाने विकला जात आहे. सध्या मक्याला चांगला उठाव आहे. मात्र मागील दोन वर्षांमध्ये इथेनाॅलमुळे मक्यामध्ये तेजी आली होती. यंदा इथेनाॅलसाठी तांदूळ आणि उसाचाही पर्याय आहे. त्यामुळे मक्याच्या दरात फारशी तेजी दिसून आली नाही. तसेच खरिपातील मक्याची लागवड देशभरात वाढली आहे. मक्याचा पेरा जवळपास १२ टक्क्यांनी वाढला. राज्यातही मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. याचा दबाव दरावर राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..भेंडीची आवक कमीचराज्यातील बाजारात भेंडीची आवक मर्यादीत आहे. तर दुसरीकडे भेंडीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे भेंडीचे दर तेजीत दिसत आहेत. भेंडी पिकालाही पावसाचा तडाखा बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजारातही भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या भेंडीला सरासरी २५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. मुंबई मार्केटला आज भेंडी सरासरी ५ हजार ते ५५०० रुपयाने विकली गेली. तर पुणे बाजारात ३५०० ते ४ हजार रुपये दर मिळाला. इतरही काही बाजारांमध्ये सरासरीपेक्षा अधिक दर होता. बाजारातील भेंडीची आवक आणखी काही आठवडे मर्यादीतच राहण्याचा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.