Market Bulletin: सोयाबीनमध्ये वाढदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही कमी आहे. सध्या सोयाबीनला सोयातेल आणि सोयापेंडचासाठी चांगला उठाव मिळत आहे. सोयापेंडची निर्यातही चांगली सुरु आहे. याचा आधार सोयाबीन दराला मिळत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव सध्या प्रतिक्विंटल ५ हजार ८०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारात सोयाबीनला सध्या ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. युध्दामुळे तेलाला चांगला भाव मिळत आहे. सोयाबीनची बाजाारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज असून सोयाबीनच्या भावालाही आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Raisin Season: बेदाणा हंगाम अंतिम टप्प्याकडे.कापसाला उठावकापसाला उठाव वाढलेला आहे. बाजारातील कापसाची आवकही घटलेली आहे. यामुळे सध्या कापूस भाव वाढलेले आहेत. देशात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पाॅलिस्टरचे भावही वाढलेले आहेत. यामुळे कापसाला चांगला उठाव वाढत आहे. देशातील बाजारात कापसाचा वापर वाढला आहे. सुत आणि रुई निर्यातीलाही पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे देशात कापूस सध्या ८ हजार ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळात कमी होणार आहे. तर वाढलेली मागणी लक्षात घेऊन सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव वाढवला आहे. कापसाच्या भावातील सुधारणा काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..गवार तेजीतराज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Farmer Payment Crisis: ऊसबिले थकबाकीत तब्बल ३२ पट वाढ.गव्हाची आवक वाढलीदेशातील बाजारात सध्या गव्हाची आवक वाढली आहे. याचा दरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा देशात गव्हाची लागवड वाढली होती. तर गहू पिकासाठी पोषक हवामानही होते. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाची काढणी देशभरात सुरु झालेली आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..मका भाव दबावातचदेशातील बाजारात मक्याचा भाव दबावातच आहे. मक्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते १ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. रब्बीतील आवकही चांगली राहण्याची शक्यता आहे. देशातील मका उत्पादन यंदा वाढले आहे. यामुळे आवकेचा दबाव दिसून येत आहे. मक्याला सध्या उठाव काहिसी वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण उत्पादनही चांगले असल्याने दरपातळी काही दिवस स्थिर दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.