Market Bulletin: कापसाला उठावदेशातील बाजारात कापसाला उठाव कायम आहे. कापसाचे भाव आज स्थिरावले आहेत. रुई आणि सरकीचे भाव टिकून असल्याने कापसालाही उठाव आहे. कापसाचा भाव आज स्थिरावला होता. आज कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सध्या बाजारातील आवक कमी आहे. पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचा भाव पुढील काही दिवस स्थिरावण्याची शक्यता कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. .मका दबावातचदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याचा भाव दबावातच आहे. मक्याला सध्या उठाव स्थिर आहे. तर यंदा मक्याचे उत्पादन वाढल्याने बाजारातील आवक चांगली आहे. मका आवकेचा दबाव असल्याने भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहेत. सध्या मक्याला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याची आवक पुढील काळातही टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याचा भावही सध्याच्या पातळीदरम्यान काही दिवस राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Chana Procurement Issue: बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी ठप्प.गहू आवक वाढलीदेशातील बाजारात गहू आवकेचा दबाव वाढला आहे. सर्वच महत्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये गहू काढणीला वेग आला आहे. त्यामुळे सर्वच महत्वाच्या बाजारांमध्ये आवकेचा दबाव आहे. सध्या गव्हाला बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी २ हजार २०० ते २ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. गव्हाची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या भावावरील दबावही कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. .India Sugar Season: देशाच्या साखर हंगामाची पंधरवड्यात समाप्ती.तूर दबावातदेशातील बाजारात तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहिसे चढ उतार दिसून आली आहेत. स्थानिक बाजारातील आवकही सरासरीच्या तुलनेत कमी दिसत आहे. तरीही तुरीला उठावही चांगला आहे. असे असले तरीही तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. तुरीला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची आयातही सुरु आहे. तुरीचा भाव काही दिवस स्थिर राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.