Market Bulletin: सोयाबीन स्थिरमागील ३ दिवसांच्या चढ उतारानंतर सोयाबीनचे भाव आज स्थिर दिसले. बाजारातील सोयाबीनची आवक पुन्हा कमी होत आहे. पॅनिक सेलिंग थांबल्यानंतर सोयाबीनचे पडलेले भाव पुन्हा सावरताना दिसले. सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आज प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसाला संथ उठावदेशातील बाजारात कापसाला सध्या उठाव कमी दिसत आहे. बाजारातील कापसाची आवकही कमीच आहे. तरीही कापसाचा भाव दबावात आहे. आज कापूस देशातील बाजारात स्थिर होता. कापसाची बाजार समित्यांमधील विक्री ७ हजार ६०० ते ८ हजारांच्या दरम्यान होत आहे. सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केले आहेत. तरीही सीसीआयच्या कापूस विक्रीला व्यापारी, मिल्स आणि निर्यातदारांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. कापसाची आयातही सुरु आहे. त्यामुळे कापसाचे भाव पुढील काळात सीसीआयच्या कापूस दरानुसार बदलण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Soybean Price: नांदेड बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण सुरूच.उडदाचा दबावातचबाजारात सध्या उडदाची आवक कमी आहे. तर उडदाला चांगला उठाव आहे. असे असतानाही उडदाचे भाव दबावात आहेत. उडदाला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर उडदाचा हमीभाव ७ हजार ८०० रुपये आहे. सध्या बाजारातील आवक कमीच असली तरी आयात सुरु आहे. आयातीचा दबाव दरावर दिसून येत आहे. तसेच इतर कडधान्याचे भाव दबावात आहेत. याचाही परिणाम होत आहे. उडदाचे भाव आणखी काही दिवस या पातळीच्या दरम्यान दिसू शकतात, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Turmeric Price: हळदीचे दर टिकून.मक्याला मागणी कमीचदेशातील बाजारात मक्याचे भाव मागील काही दिवसांपासून कमीच आहे. मक्याची बाजारातील आवक काहीशी सुधारलेली दिसत आहे. तर दुसरीकडे मक्याला इथेनाॅलसाठी असलेला उठाव कमी दिसत आहे. त्यातच अमेरिकेतून डीडीजीएसची आयात होणार असल्याची बातमी बाजारात पसरली आहे. याचा मक्याच्या भावावर परिणाम होत आहे. सध्या मका बाजारात १५०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मक्याचा भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .भेंडी टिकूनराज्यातील बाजारात भेंडीचा भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. बाजारातील भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव चांगला आहे. यामुळे दर टिकून आहेत. यंदा अनेक भागात भेंडीची लागवड कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा परिणाम आवकेवर दिसत आहे. सध्या भेंडी प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयाने विकली जात आहे. पुढील काही दिवस राज्यातील बाजारात भेंडीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भेंडीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज भेंडी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.