Market Bulletin: कापसात सुधारणा देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावात असलेली सुधारणा कायम आहे. इराण युध्दामुळे पाॅलिस्टरचे भाव वाढले आहेत. याचा आधार कापसाच्या भावालाही मिळत आहे. कापसाचा कमाल भाव मानवत बाजारात आज ९ हजारांवर पोचला होता. पण कापसाचा सरासरी भाव ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची मागणी पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. तर बाजारातील कापसाची आवक कमीच राहणार आहे. त्यामुळे कापसाचे भावही काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकून देशातील बाजारात सोयाबीनला चांगला उठाव आहे. सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा टिकून आहे. खाद्यतेलाच्या भावात वाढ झाल्याने सोयातेलाचेही दर सुधारले आहेत. तर सोयापेंडेलाही मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव सध्या हमीभावाच्या पुढे सरकला आहे. सोयाबीनला बाजारात सध्या साडेपाच हजारांच्या आसपास भाव मिळ आहे. सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयाने सोयाबीन विकले जात आहे. सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .India Wheat Production: गहू उत्पादनात एकरी दोन क्विंटलची घट.मका स्थिरदेशातील बाजारात मक्याचा भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. यंदा मक्याचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. मक्याच्या भावाने आतापर्यंत महीभावाचा टप्पा पार केलेला नाही किंवा हमीभावाच्या जवळही भाव पोचले नाहीत. देशातील उत्पादन वाढले आणि मागणी मात्र स्थिर राहीली. यामुळे मक्याच्या भावावर दबाव आहे. सध्या बाजारात मका १६०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. यामुळे भाव या पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Pulses Import Policy: आत्मनिर्भरतेला वाटाण्याच्या अक्षता.भेंडीला मागणी राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक कमीच आहे. भेंडीला उठाव मात्र कायम आहे. भेंडीला मागील काही महिन्यांपासून चांगला भाव मिळत आहे. मात्र मागील २ आठवड्यांपासून इतर भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याचा भेंडीलाही फटका बसला. भेंडीचे भाव अनेक बाजारांमध्ये नरमले आहेत. सध्या भेंडी सरासरी १४०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये भेंडीची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .हरभरा आवकेचा दबावदेशातील बाजारात हरभऱ्याची आवक सध्या चांगली सुरु आहे. भावावर आवकेचा दबाव असल्याने सध्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या हरभऱ्याला बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील हरभऱ्याची आवक चांगली सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.