Market Bulletin:कापूस दरात सुधारणाकापसाच्या भावात मागील २ दिवसांपासून काहिशी सुधारणा दिसून आली आहे. कापसाची बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पाॅलिस्टरचे भावही वाढले आहेत. यामुळे कापसाला उठाव मिळत आहे. आज बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.युध्दामुळे तेलाचे भाव चढेच राहीले तर कापसाच्या भावातील तेजीही कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकानी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनला सध्या तेलासाठी चांगला उठाव मिळत आहे. तर शेजारच्या देशांमध्ये सोयापेंडची निर्यातही चांगली सुरु आहे. यामुळे सोयाबीनला आधार मिळत आहे. आज सोयाबीनला बाजारात ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक सध्या कमीच आहे. पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील सुधारणाही टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Plywood Price Rise: प्लायवूडच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ.ज्वारीला उठावदेशात सध्या ज्वारीला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील आवकही सध्या चांगली दिसत असली तरी ज्वारीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून ज्वारीच्या भावात वाढ झाली आहे. सध्या ज्वारीला बाजारात गुणवत्ता आणि वाणानुसार ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन भावाला चांगला आधार, कापूस दर टिकून, भेंडीची आवक स्थिर, कैरीला वाढती मागणी तर टोमॅटो आवक टिकून.कलिंगडाची आवक वाढलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कलिंगडाची आवक सुधारली आहे. वाढलेल्या उन्हामुळे कलिंगडाला उठाव असला तरी आवकेचा दबाव आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून कलिंगडाचे भाव काहीसे नरमले आहेत. सध्या कलिंगडाला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात कलिंगडाला उठाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजारातील आवकही टिकून राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .तूर स्थिरावलीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव स्थिरावला आहे. तुरीची आवक कमी झालेली आहे. तर यंदाही उत्पादन कमीच आहे. आयातही सध्या युध्दामुळे काहीशी प्रभावित झाली आहे. मात्र पुढील काळातही आयात होण्याची शक्यता कायम आहे. यामुळे तुरीचा भाव देशातील बाजारात स्थिरावला आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आवक पुढील काळात काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.