Agrowon Podcast : जिऱ्याचे भाव बाजार समित्यांसह वायद्यांमध्येही तेजीत

Jeera Market : देशात सध्या जिऱ्याचे भाव तेजीत आहेत. जिऱ्याचा पुरवठा कमी झाला असून मागणी मात्र टिकून आहे. याचा परिणाम दरावर होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी देशातील जिरा उत्पादन घटले.
Jeera Market
Jeera MarketAgrowon
Published on: 
Updated on: 

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील सुधारणा कायम होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १४.७१ डाॅलरवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४१७ डाॅलरवर होते. मात्र देशातील बाजारात आज स्थिर होता.

सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपये भाव मिळाला. बाजारातील आवकही दोन लाख क्विंटलच्या दरम्यान होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी वाढल्यास देशातही दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे सोयाबीन बाजारातील जाणकारांनी सांगितले.

२) कापूस वायद्यांमध्ये नरमाई (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे दबावात आहेत. कापूस वायदे आज दुपारपर्यंत ८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातही वायद्यांनी ५६ हजार ६०० रुपयांची पातळी गाठली. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांवर कायम होते.

देशातील बाजारात आजही ५० हजार गाठींच्या दरम्यान कापूस आला होता, असे जाणकारांनी सांगितले. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) तुरीचा बाजारभाव तेजीतच (Tur Rate)

देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीचा बाजार सध्या १० हजारांच्या वर आहे. त्यामुळे नफावसुलीसाठी विक्रीही होताना दिसत आहे. यामुळे दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसत आहेत. आज तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

Jeera Market
Tur Market Rate : विदर्भात तुरीचे दर दहा हजारांवर स्थिरावले

४) हिरव्या मिरचीचे दर वाढले (Green Chilli)

बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक घटली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या बाजारांमध्ये आवक जास्त दिसते. पण ही आवक सरासरीपेक्षा कमीच आहे.

त्यामुळे हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Jeera Market
Soybean Market Rate : अमेरिकेत सोयाबीन पिकाची पावसाअभावी होरपळ; दरात वाढ

५) यंदा जिऱ्याच्या दरात एवढी तेजी का आली? (Jeera Rate)

देशात सध्या जिऱ्याचे भाव तेजीत आहेत. जिऱ्याचा पुरवठा कमी झाला असून मागणी मात्र टिकून आहे. याचा परिणाम दरावर होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी देशातील जिरा उत्पादन घटले. बदलते वातावरण आणि पावसाचा पिकावर परिणाम झाला. यामुळे उत्पादन कमी राहीले.

गेल्यावर्षी आणि चालू हंगामातही ही परिस्थिती दिसली. यामुळे देशातील जिरा स्टाॅकही कमी झाला. बाजारात जिऱ्याची उपलब्धता कमी होत गेली. पण दुसरीकडे जिऱ्याला बाजारात चांगला उठाव मिळाला. निर्यातीसाठी मागणी चांगली आहे. त्यातही चीनला होणारी निर्यात वाढली. यामुळे जिऱ्याच्या भावात वाढ झाली.

सध्या जिऱ्याचे भाव वायद्यांमध्ये प्रतिक्विंटल ५२ हजारांवर पोचले. तर बाजार समित्यांमधील भावही ५१ हजारांवर पोचला. हा भाव गेल्या १२ वर्षांतील उच्चांकी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशात जिरा बाजाराला मजबूत आधार आहे.

जगातील इतर जिरा उत्पादक देशांमध्येही उत्पादनाला फटका बसला. या टर्की आणि सिरिया या देशांचा समावेश आहे. या दोन्ही देशांमध्ये यंदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर जिरा तेजीत आहेत. जिऱ्याच्या भावात पुढील काळात चढ उतार कायम राहू शकतात. पण जिऱ्याच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com