

Nagpur News : स्टॉक लिमिट लावल्यानंतर बाजारात तुरीचे दर खाली येतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार शनिवारी (ता. १७) विदर्भातील काही बाजार समित्यांमध्ये दर १० हजार रुपयांच्या खाली आले आहेत. तर काही बाजार समित्यांमधील तेजी कायम असल्याची स्थिती आहे.
हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीमध्ये तुरीची ११८१ क्विंटल आवक होत दर ९१०० ते १०४८५ याप्रमाणे होते. शेगाव बाजार समितीमध्ये मात्र दरात काहीशी घसरण नोंदविण्यात आली होती. या ठिकाणी तुरीला ९००० ते ९८०० रुपयांचा दर मिळाला.
दर्यापूर (अमरावती) बाजार समितीमधील आवक १५७९ क्विंटलची तर दर ८३०० ते १०१७५ याप्रमाणे होते. खामगाव (बुलडाणा) बाजारातील तुरीचे दर ७७०० ते १०२०० असे होते. मालेगाव (वाशीम) बाजारात देखील दर दहा हजारांच्या खाली मिळाले.
९००० ते ९४०० याप्रमाणे तुरीचे या ठिकाणी व्यवहार झाले. स्टॉक लिमिटची अंमलबजावणी होईपर्यंत तुरीच्या दराने चांगलीच झेप घेतली होते. १०,८०० रुपयांपर्यंत दर पोचले होते. त्यानंतरच्या काळात मात्र दर दहा हजार रुपयांच्या आसपास राहिले आहेत. काही बाजार समित्यांमध्ये प्रतवारीनुसार मात्र १,५०० असाही दर मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.