Market Bulletin: सोयाबीन भाव टिकूनदेशातील बाजारात मागील आठवडाभरापासून सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा टिकून आहे. सोयाबीनचा भाव ६ हजारांच्या दरम्यान पोचला आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भावही ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ५ हजार ६०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनला उठाव कायम राहील. यामुळे सोयाबीन भावातील सुधारणाही पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसाला उठाव कायमदेशातील बाजारात मागली काही दिवसांपासून कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाला सध्या उठाव चांगला आहे. कापड निर्मितीसाठी कापसापासून तयार होणाऱ्या सुताला मागणी वाढली आहे. या मागणीमुळे कापसाच्या भावातही सुधारणा झाली आहे. कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या पुढे सरकला आहे. कापसचा भाव सरासरी ८ हजार ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सीसीआय कापूस विक्रीचे भाव वाढवत आहे. कापसाला मागणी असल्यामुळे दरातील सुधारणा पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Telangana Maize Procurement: तेलंगणात राज्य सरकारकडून १५ लाख टन मक्याची खरेदी.आल्याचे दरात सुधारणाआल्याच्या भावात मागच्या काही दिवसांमध्ये काहीशी वाढ दिसून आली आहे. राज्यातील अनेक बाजारांमध्ये आल्याची आवक कमी झालेली आहे. तर सध्या आल्याला उठाव चांगला आहे. आल्याला लग्न सराईमुळे चांगली मागणी आहे. त्यामुळे आल्याचा भाव ४ हजारांच्या पुढे सरकला आहे. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे. आल्याची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आल्याचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Watermelon Price Drop: कलिंगडाचे दर कोसळले.हिरवी मिरची सुधारलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीचा भाव काहीसा वाढला आहे. हिरव्या मिरचीला सध्या बाजारात चांगला उठाव आहे. लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी आहे. त्यामुळे भाव पातळी वाढली आहे. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मिरची पिकाला वाढत्या उन्हाचाही जोरदार तडाखा बसत आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काळात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..शेवगा आवक टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक वाढली होती. तर शेवग्याला मिळणारा उठाव मात्र स्थिर आहे. तसेच इतर भाजीपाल्याचे भावही सध्या कमीच आहेत. त्यामुळे शेवग्यावरही दबाव आहे. सध्या बाजारात शेवगा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजाराने विकला जात आहे. बाजारातील शेवग्याची आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामळे शेवग्याचा भावही सध्याच्या पातळीच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.