Market Bulletin: सोयाबीन टिकूनसोयाबीनच्या दरात झालेली सुधारणा कालपासून कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदी भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. दुसरीकडे बाजारातील आवक कमीच आहे. सोयाबीनची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. हमीभावाने सोयाबीनची खरेदीही सुरु आहे. सोयाबीनच्या खुल्या बाजारातील भाव ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील २ आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .मका दर दबावातचदेशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातही मक्याची लागवड वाढत आहे. त्यातच मक्यासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात रब्बी हंगामातही वाढ होण्याची शक्यता आहे. याचा दबाव दरावर आहे. आजही देशभरात मक्याचा सरासरी १६०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मक्याची मागणीही संथ आहे. पुढील काही आठवडे बाजारातील मक्याची आवक टिकून राहण्याची शक्यता आहे. याचा दबाव दरावर राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: कांदा आवकेत सुधारणा; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दराला आधार, कांद्यात चढ उतार, हळदीचे भाव टिकून.बोरांना उठावराज्यातील बाजारात आंबट गोड बरांना सध्या चांगला उठाव आहे. परंतु बाजारातील आवक मर्यादीतच दिसत आहे. यंदा बोरांना पोषक वातावरण नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अतिथंडी आणि वातावरणातील बदलामुळे बोरांमध्ये किडीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी बोरांची गुणवत्ता कमी आहे. बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे. राज्यात सध्या बोरांना गुणवत्ता आणि वाणानुसार सरासरी २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. बोरांची आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली..Silk Cocoon Arrival: बीडमध्ये रेशीम कोषांची आवक घटली, दर वधारले.भेंडीला मागणीराज्यातील बाजारात भेंंडीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. सध्या केवळ पुणे आणि मुंबई बाजारातच भेंडीची आवक काहीशी अधिक दिसत आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. याचा आधार भेंडीच्या दराला मिळत आहे. भेंडीला सध्या बाजारात गुणवत्तेनुसार सरासरी ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान मिळत आहे. भंडीची बाजारातील आवक आणखी काही दिवस मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंतही दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..हरभरा दर दबावातचदेशातील बाजारात हरभऱ्याचा भाव सध्या दबावातच आहे. बाजारातील हरभऱ्याची आवक सध्या कमी आहे. मात्र आयातीचा दबाव आहे. हरभरा आयातीवर १० टक्के आयात शुल्क आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा अधिक असल्यास आयात वाढते. त्यामुळे आयातीवर शुल्काचा फार परिणाम होण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले. सध्या हरभरा ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. रब्बीतील हरभरा लागवडही चांगली सुरु आहे. यंदा पोषक हवामान असल्याने उत्पादन चांगले राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा दबाव हरभरा दरावर राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.