Market Bulletin: सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आजही टिकून होता. कालपासून सोयाबीनच्या भावात स्थिरता आली आहे. प्रक्रिया प्लांट्सचा सोयाबीन खरेदीचा भाव ७ हजारांच्या दरम्यान कायम होता. प्रक्रिया प्लांट्सनी ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केले. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकले गेले. सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु झाल्यामुळे बाजारातील आवकही कमी जास्त होत आहे. बाजारातील विविध चर्चांमुळे सध्या बाजारात अस्थिरता दिसत आहे. पुढील काही दिवस सोयाबीन भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस स्थिरावलादेशातील बाजारात आज कापसाचा भाव स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव एका पातळीच्या दरम्यान कमी जास्त होत आहेत. देशात सीसीआय मात्र कापूस विक्रीचा भाव कमी करत असल्याने रुईचा भाव नरमला आहे. शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव मात्र टिकून आहे. सरकीला चांगला उठाव असल्याने कापसाला आधार मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला ८ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. रुपईच्या भावात काहीसे चढ उतार होत असले तरी सरकीचे भाव टिकून आहे. सरकी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दमरम्यान विकला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरातील स्थिरता आणि देशातील कमी आवक यामुळे पुढील काळात कापूस दर स्थिरावू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Global Cotton Production: जागतिक कापूस उत्पादन घटणार.गहू आवक घटली बाजारातील गव्हाची आवक मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे. सरकारची गहू खरेदीही यंदा वाढलेली आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे. बाजारात सध्या गव्हाला गुणवत्तेप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारात पुढील काळात गव्हाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. तर रब्बी हंगामात गहू पिकाला पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. यामुळे गव्हाचा भाव पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान स्थिरावू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: मक्याचा भाव टिकून; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापूस दरात कपात, हिरवी मिरची सुधारली तर आंबा दर टिकून.आल्याचे भाव टिकून आल्याची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून काहीशी स्थिरावली आहे. लग्नसराईमुळे आल्याला चांगला उठाव होता. याचाही आधार दराला मिळाला. आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात आले सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. आल्याला पुढील काळातही मागणी राहण्याची शक्यता आहे. तर आल्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .कारले स्थिरावलेराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी असल्यामुळे भाजीपाला भावात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कारल्याची आवकही गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे. तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे. याचा आधार कारल्याच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. पुढील काळात आवकेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरपातळी टिकून राहण्यास मदत होईल, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.