Market Bulletin: सोयाबीनमध्ये नरमाईदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी नरमाई पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आज १०० ते १५० रुपयांनी कमी झाले होते. तर बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. असे असले तरी बाजार समित्यांमधील भावातही आज १०० रुपयांपर्यंत नरमाई पाहायला मिळाली. सोयाबीनची विक्री आज ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान झाली आहे. सोयातेलाचे नरमलेले भाव आणि सोयापेंडला धिमा उठाव यामुळे नरमाई आल्याचे जाणकारांनी सांगितले. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसावरील दबाव कायमदेशातील बाजारात कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तरीही कापसाला पुढे उठाव कमी असल्याचे सांगत व्यापारी कमी भावात खरेदी करत आहेत. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे कापसाची खरेदी ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान होताना दिसत आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण घडामोडी बघता कापसाच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Watermelon Production: खानदेशात कलिंगडाच्या उत्पादन खर्चात वाढ .आल्याचा बाजार टिकूनराज्यातील बाजारात आल्याची आवक मर्यादीत आहे. तर आल्याला उठाव चांगला मिळत आहे. सण आणि समारंभ तसेच प्रक्रिया उद्योगाचीही खरेदी सुरु आहे. यामुळे आल्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहे. राज्यातील मोठे बाजार वगळता इतर ठिकाणची आवक सरासरीपेक्षा कमी दिसत आहे. तर सध्याची भावपातळी सरासरी ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान आहे. गुणवत्तापूर्ण माल ५५०० रुपयांपर्यंतही विकला जात आहे. आल्याची आवक आणि मागणी पाहता आल्याचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..Tobacco Price Fall: तंबाखू दरात घसरण.काकडीला उठावराज्यातील बाजारात काकडीची आवक काहीशी सुधारत आहे. पण आवक सध्या मागणीच्या तुलनेत फारशी वाढलेली दिसत नाही. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने काकडीची मागणी मात्र वाढत आहे. सध्या बाजारात काकडी प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयाने विकली जात आहे. काही बाजारांमध्ये गुणवत्तापूर्ण काकडीला २२०० रुपायंपर्यंतही भाव मिळत आहे. बाजारातील काकडीची आवक पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारण्याचा अंदाज आहे. मात्र वाढत्या उन्हासह मागणी राहू शकते. त्यामुळे काकडीच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज काकडी बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..मका दबावाताचदेशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरु आहे. त्यातच आयातीची शक्यता असल्याने दबाव वाढला आहे. देशातील उत्पादन यंदा वाढलेले आहे. त्याचा दबाव दरावर आधीच आलेला आहे. रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव यंदा कमी झालेला आहे. याचा दबाव भावावर आलेला आहे. सध्या मका बाजारात १६०० ते १९०० रुपयाने विकला जात आहे. पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबावरही कायम राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.