Market Bulletin: कापसाला आधारदेशातील बाजारात कापसाला चांगला आधार मिळत आहे. कापसाला उठाव वाढल्यामुळे मागणी आली. परिणामी दरातही वाढ झाली आहे. सीसीआयने कापूस विक्रीच्या भावात मार्चपासून आतापर्यंत ४ हजार रुपयांचा वाढ केली आहे. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सीसीआयने आतापर्यंत ४५ लाख गाठी कापसाची विक्री केली आहे. देशात कापसाला उठाव असल्याने दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये सुधारणा देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आहे. सोयाबीनला देशात चांगला उठाव मिळत आहे. सोयातेल आणि सोयामीलच्या भावातही सुधारणा दिसून आली. यामुळे सोयाबीनचा भाव आता सरासरी ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनला उठाव असल्याने दरात झालेली सुधारणा टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Banana Price: केळीचे दर पोहोचले नीचांकी पातळीवर.आल्याला उठावमगील काही दिवसांपासून राज्यात आल्याला उठाव मिळत आहे. बाजारातील आल्याची आवक काही प्रमाणत कमी झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे मागणी टिकून असल्याने दरात सुधारणाही दिसून आली. सध्या आल्याला बाजारात ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आल्याला सध्या सण आणि समारंभांमुळे चांगली मागणी आहे. तर पुढील काळात आवक काहिशी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आल्याच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Watermelon Price: कलिंगड, खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडले अडचणीत.केळी टिकून राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून केळीच्या भावाला आधार मिळत आहे. वाढत्या उन्हाचा फटका पिकाला बसत आहे. गारपीट आणि पावसाचाही दणका बसला. यामुळे केळीची बाजारातील आवक काहिशी कमी झाल्याचे दिसते. तर वाढत्या उन्हामुळे सध्या केळीला उठाव मिळत आहे. सध्या बाजारात केळी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. केळीला पुढील काळातही चांगला उठाव राहू शकतो. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .गवार तेजीतराज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.