Markt Bulletin: लसणाला उठावसध्या लसूण बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी ८ हजार ते १० हजाराने विकला जात आहे. तर काही बाजारात उचांकी १५ हजारांचाही भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात लसणाला उठाव वाढला आहे. बाजारातील लसणाची आवक मर्यादीत आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी दिसत आहे. परिणामी लसणाचे दर वाढले आहेत. सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी बाजारांमध्यचे काहीशी अधिक आवक आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. यामुळे दराला आधार आहे. लसूण बाजारातील ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज लसूण बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..मोसंबी आवक सुधारलीबदलत्या वातावरणाचा मोसंबीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक होणाऱ्या जास्तीत जास्त मालात गुणवत्तेची समस्या आहे. परंतु राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून मोसंबीची आवक सुधारली आहे. सध्या बाजारात गुणवत्तेच्या मालाला चांगला उठाव आहे. हा माल ५ हजार ते ५५०० रुपयाने विकला जात आहे. तर सरासरी भाव ३ हजार ते ४ हजारांच्या दरम्यान आहे. मोसंबीची बाजारातील आवक पुढील काळात काहीशी सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मोसंबी व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Cotton Farmer Issue: कापूस वेचणी आणखी महागली.शेवगा तेजीतराज्यातील बाजारा मागील काही दिवसांपासून शेवग्याचे भाव तेजीतच आहेत. शेवग्याला सर्वच बाजारांमध्ये चांगला भाव मिळत आहे. बाजारातील शेवग्याची आवक खूपच कमी आहे. तर शेवग्याला उठाव आहे. यामुळे दरात मोठी वाढ झाली. सध्या बाजारात शेवगा प्रतिक्विंटल सरासरी २० हजार २५ हजाराने विकला जात आहे. बाजारात मालच येत नसल्याने विक्रमी दर मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पुढील काही दिवस बाजारातील शेवग्याची आवक कमीच राहू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Sugar Stock Rule: साखर साठ्याचे नियम तोडल्यास कारवाई करू.सोयाबीन दरात सुधारणाराज्यातील बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव क्विंटलमागे २० ते ५० रुपयांनी वाढले होते. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत पोचले होते. रविवारी बाजारातील आवक कमी होती. तर बाजार समितीमध्ये सोयाबीन ४ हजार ४०० ते ५ हजारांच्या दरम्यान विकल्या गेले. पुढील काळात बाजारातील सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापूस दर टिकूनकेंद्र सरकारने कापूस आयातीवर आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे कापसाच्या दराला आधार मिळत आहे. बाजारात कापसाची आवक कमी आहे. तर दुसरीकडे सीसीआयची कापूस खरेदी जोरात सुरु आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ दिसून येत आहेत. राज्यातील प्रमुख बाजरात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ७०० ते ८ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक दरवाढीच्या अपेक्षेने कमी झाली आहे. तर सीसीआय खरेदीत कायम असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.