Agrowon Podcast : बाजारातील कापूस आवक वाढली की घटली ?

Market Update : बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चांगलेच वाढल्याने भारताचा कापूस सध्या स्वस्त आहे.
Cotton
Cotton Agrowon

Market Bulletin : देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. तर कमाल भाव अनेक बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान गेला. बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चांगलेच वाढल्याने भारताचा कापूस सध्या स्वस्त आहे.

त्यामुळे भारतीय कापसाला उठाव मिळतोय. परिणामी देशातील भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे कापूस भावात यापुढील काळातही वाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला. 


कापूस बाजारावरील दबाव आजही कायम आहे. सोयाबीनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातली मंदी, खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि बाजारातील आवक यामुळे दबावात आले. सोयाबीनचे भाव मागील काही दिवसांपासून ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात.

घटलेल्या भावातही रोज दीड ते पावणेदोन लाख क्विंटलच्या दरम्यान बाजारात आवक होत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस सोयाबीन बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Cotton
Cotton Exports : कापूस निर्यातील अनुकूल स्थिती परंतु दराची स्थिती काय?

गवारचे भाव मागील काही आठवड्यांपासून कायम आहेत. बाजारातील गवारची आवक कमी झाली. उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे गवारच्या भावातील तेजी कायम आहे. आजही गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळाला.

गावरची लागवड कमी असल्याने मालही कमी उपलब्ध होत आहे. सध्या गवारच्या लागवडीही कमी दिसतात. त्यामुळे पुढील काळातही गवारची आवक कमी राहून भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे, असे भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Cotton
Cotton Market : कापूस बाजारपेठेत ‘कस्तुरी ब्रॅण्ड’चा प्रवेश

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याचे भाव टिकून आहेत. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून आहेत. खरिपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे. तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे.

परिणामी बाजारीचा भाव टिकून आहे. बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही. त्यामुळे पुढील काळातही बाजारीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com