Market Bulletin: सोयाबीनमध्ये घटदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात २ दिवसांमध्ये क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. आफ्रिकेतून होत असलेली आयात, जीएम सोयापेंड आयातीची चर्चा आणि सोयापेंड निर्यातीला वाढलेल्या भावामुळे कमी झालेली मागणी यामुळे देशात सोयाबीनच्या भावात नरमाई दिसून आली आहे. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटलमागे दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. बाजारात आज सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. बाजारातील स्थिती पाहता पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसात चढ उतारकापसाच्या भावात काही बाजारांमध्ये आज काहीसे चढ उतार दिसून आले होते. सीसीआयने मागील काही दिवसांमध्ये कापूस विक्रीचा भाव कमी केला होता. तसेच आयात शुल्क काढल्यानंतरही भावात काहीशी नरमाई आली होती. याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. बाजार समित्यांमध्ये कापूस सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ४०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसून आले आहेत. याचा देशातील बाजारावरही परिणाम दिसत आहे. कापूस बाजारात पुढील काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Banana Rate: केळीचे दर अस्थिरच.गव्हाचा भाव स्थिरबाजारातील गव्हाची आवक मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे. सरकारची गहू खरेदीही यंदा वाढलेली आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे. बाजारात सध्या गव्हाला गुणवत्तेप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारात पुढील काळात गव्हाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. तर रब्बी हंगामात गहू पिकाला पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. यामुळे गव्हाचा भाव पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान स्थिरावू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये नरमाई; कापूस आज स्थिर, हरभरा आवक घटली, कांद्यात काहीशी सुधारणा तर आल्याचे भाव टिकून .केळीला उठावराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून केळीची आवक कमी झाली आहे. तर केळीला चांगला उठाव आहे. मागील काही महिन्यांमध्ये केळी पिकाला राज्यभरात वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला आहे. यामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात केळीला प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तर केळीला उठाव चांगला राहील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..काकडी दरात वाढराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून काकडीची आवक कमी झालेली आहे. तर काकडीला उन्हामुळे मागणी कायम आहे. यामुळे दरात सुधारणा झाली आहे. बाजारात सध्या काकडीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. काकडी पिकाला मागील दोन महिन्यात उष्णतेचा फटका बसला. तसेच अनेक भागात पाणीटंचाई जाणवत होती. याचा काकडीच्या उत्पादनावर परिणाम दिसत आहे. पुढील काळात काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.