Market Bulletin: कापसाला उठावदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावाला चांगला आधार आहे. कापसाला वाढलेला उठाव कायम आहे. सरकीचे दरही कायम आहेत. पाॅलिस्टरचे भाव वाढल्याने सुतालाही मागणी आहे. त्यामुळे सध्या कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक कमी झालेली आहे. त्यामुळे कापसाच्या भावाला मिळालेला आधार कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .हरभरा आवक वाढलीदेशातील बाजारत हरभऱ्याची आवक चांगली सुरु आहे. हरभरा उत्पादन यंदा वाढल्याने बाजारावर आवकेचा दबाव आहे. हमीभावाने सुरु असलेली राज्यातील खरेदी बारदाणा टंचाईमुळे बहुतांशी भागात ठप्प झाली आहे. या सर्व कारणांनी हरभरा भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा दरही या पातळीच्या दरम्यान स्थिरावू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: मक्यावरील दबाव कायम; कापसाला उठाव, गहू आवक वाढली, तूर दबावात तर ज्वारी आवक सुधारली.तूर दबावातदेशातील बाजाराता तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहिसे चढ उतार दिसून आली आहेत. स्थानिक बाजारातील आवकही सरासरीच्या तुलनेत कमी दिसत आहे. तरीही तुरीला उठावही चांगला आहे. असे असले तरीही तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. तुरीला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची आयातही सुरु आहे. तुरीचा भाव काही दिवस स्थिर राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..India Sugar Season: देशाच्या साखर हंगामाची पंधरवड्यात समाप्ती.सरकीचे दर टिकूनदेशातील बाजारात मागील काही महीनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळत आहे. सध्या सरकी बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होत आहे. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..पपईला मागणीवाढत्या उन्हामुळे पपईला सध्या चांगली मागणी आहे. मागील काही दिवसांमध्ये पपईच्या भावातही काहिशी वाढ झाली आहे. पपईची बाजारातील आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याचा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या पपईला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते २ हजार रपये भाव मिळत आहे. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे. पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.