Market Bulletin: सोयाबीन स्थिरावले आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील ३ दिवसांपासून काहीसे स्थिरावले आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक सध्या मर्यादीत आहे. यामुळे दरपातळी टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस आवक कमीचदेशातील बाजारात कापसाची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. सीसीआयची खरेदी सुरु आहे. त्यामुळे सीसीआयच्या केंद्रांवर चांगली आवक दिसत आहे. खुल्या बाजारातील आवक कमी झालेली आहे. युध्दामुळे सुताला सध्या उठाव कमी असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही सध्या कमी प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाचा भाव पुढील काही दिवस स्थिर दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Export Surcharge Increase: आखाती देशांत निर्यातीवर आपत्कालीन अधिभार.मिरची तेजीतराज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून.ज्वारीचा भाव टिकूनराज्यातील बाजारात ज्वारीचा भाव टिकून आहे. बाजारात ज्वारीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मालदांडी ज्वारी ४ हजारांपासून ५ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लोकल ज्वारी २ हजार ७०० रुपयांपासून ४ हजारांपर्यंत विकली जात आहे. तर पांढरी ज्वारी २ हजार २०० रुपयांपासून ३ हजार ६०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. बाजारातील ज्वारीची आवक पुढील काही दिवस मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज ज्वारीचे व्यापारी व्यक्त करत आहेत..गवारचे भाव तेजीतराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून गवारचे भाव तेजीतच आहेत. गवारला बाजारात मागणीही चांगली आहे. गवार उत्पादनालाही यंदा बदलत्या वातावरणाचाही फटका पिकाला बसत आहे. त्यातच लागवडही कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने गवारच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. गवारचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.