Market Bulletin: कापूस दरात सुधारणाकापसाच्या भावात मागील २ दिवसांमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून आली. कापसाला सध्या उठाव चांगला आहे. सरकीलाही उठाव आहे. सरकीचा भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कपसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावाला आधार कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात आज सोयाबीन ५ हजार १०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनला सध्या उठाव चांगला आहे. तर सोयाबीनची बाजारातील आवक कमी आहे. याचा आधार दराला मिळत आहे. सोयाबीनला सध्या सोयापेंडमुळेही चांगला आधार आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा साठा अत्यंत कमी झाला आहे. तर सोयाबीनची मागणी टिकून राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Ethanol Supply: देशात इथेनॉल पुरवठा ४१७ कोटी लिटरवर.शेवगा आवक टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक वाढली होती. तर शेवग्याला मिळणारा उठाव मात्र स्थिर आहे. तसेच इतर भाजीपाल्याचे भावही सध्या कमीच आहेत. त्यामुळे शेवग्यावरही दबाव आहे. सध्या बाजारात शेवगा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजाराने विकला जात आहे. बाजारातील शेवग्याची आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामळे शेवग्याचा भावही सध्याच्या पातळीच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले..Agrowon Podcast: कापूस,सोयाबीनला मागणी कायम; आवळ्याला उठाव, काकडी स्थिर तर बाजरी आवक कायम.पपईला उठाववाढत्या उन्हामुळे पपईला सध्या चांगली मागणी आहे. मागील काही दिवसांमध्ये पपईच्या भावातही काहिशी वाढ झाली आहे. पपईची बाजारातील आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याचा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या पपईला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते २ हजार रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे. पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..हरभरा आवकेचा दबावदेशातील बाजारात हरभऱ्याची आवक सध्या चांगली सुरु आहे. भावावर आवकेचा दबाव असल्याने सध्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या हरभऱ्याला बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील हरभऱ्याची आवक चांगली सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.