Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

Market Bulletin : सुट्टी असल्याने सोयाबीनची खरेदी विक्री बहुतांशी बाजार समित्यांमध्ये बंदी होती. तर खेडा खरेदीतील व्यवहार काही प्रमाणात सुरु होते. पण दरावर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. भावपातळी कायम होती. सोयाबीनचा भाव आजही ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे तीन दिवस बंदी असतील. त्यामुळे सोमवारी बाजार कसा खुला होतो, त्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

कापसाचे व्यवहार वायद्यांमध्ये तीन दिवस बंद राहणार असल्याने गुरुवारी बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे नरमले होते तर देशातील वायदे वाढले होते. गुरुवारी एमसीएक्सवरील वायदे ६२ हजार २२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावले होते. तर भावपातळी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवकही कमीच होती. कापूस बाजाराची स्थितीही सोमवारी बाजार सुरु झाल्यानंतर काहीशी बदलू शकते, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Cotton Market : कापूस भावाला कमी आवक, निर्यातीचा आधार

कांद्याच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. सरकारने ५ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला तरी त्याचा फायदा कांदा बाजाराला होताना दिसत नाही. आज देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचेह लिलाव बंद होते. त्यामुळे उलाढाल बंद होती. पण काही मोठ्या शहरांमधील बाजार सुरु होते. तर कांद्याचा भाव कालच्या तुलनेत जवळफास ३०० ते ४०० रुपयांनी कमी होता. आज कांद्याचे व्यवहार १ हजार ते १२०० रुपयाने पार पडले. सोमवारी व्यवहार सुरु झाल्यानंतर कांदा बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Agriculture Market
Onion Export Ban : ...आणि म्हणून कांदा निर्यातबंदी वाढविण्याचा निर्णय ; केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

बाजारातील आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे. मिरचीची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे. लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. सध्या हिरव्या मिरचीला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत. तर बाजारातील आवक वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे. सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com