Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Market Update : ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदेही एका भावपातळीभोवती फिरताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ९३ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. तर देशातील वायदे ६२ हजार ४० रुपयांवर होते.

बाजार समित्यांमध्येही क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत चढ उतार सुरु आहेत. कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी एक ते दोन आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांमध्ये काल वाढ झाल्यानंतर आज पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीन ११.९४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३३९ डाॅलर प्रतिटनांवर होते. सोयाबीन आणि सोयापेंडचा वाढलेला भाव टिकत नाही. पामतेलाचे भाव चांगले सुधारले आहेत.

पण पुरवाठा वाढल्याने सोयातेल आणि सूर्यफूल तेल स्वस्तच आहे. याचा परिणाम सोयाबीनच्याही भावावर दिसून येत आहे. देशात सोयाबीनचे भाव ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Market Committee : बाजार समित्यांना सुधारणांचे वावडे

ज्वारीची बाजारातील नरमाई कायम आहे. ज्वारीची बाजारातील आवकही दिवसेंदिवस वाढत आहे. ज्वारीचे उत्पादनही चांगले असल्याचे सध्यातही व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. पण बाजारातील आवक पुढील काळात कशी राहते हे पाहावे लागेल.

पण यामुळे दरावर दबाव आला. ज्वारीला सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.  ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

Agriculture Market
Wheat Market : खानदेशात गव्हाची आवक वाढली

हरभऱ्याचे भाव मागील चार ते पाच दिवसांपासून काहीसे नरमले आहेत. बाजारातील आवक वाढत असल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज येत आहेत.

पण वाढत्या आवकेचा परिणाम भावावर दिसत आहे. त्यामुळे सध्या हरभऱ्याला ५ हजार ४०० ते  ६ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लाल मिरचीच्या भावातील तेजी कायम आहे. त्यातच मिरचीला देशांतर्गत बाजारात आणि निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. देशात लग्न सराई आणि सणांमुळे चांगला उठाव मिळाला. तर दुसरीकडे मिरची उत्पादनात १५ टक्क्यांपर्यत घट येण्याची शक्यता आहे.

ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com