Market Bulletin: सोयाबीन तेजीतसोयाबीनच्या भावात आजही वाढ दिसून आली. सोयाबीनचा सरासरी भाव अनेक बाजारांमध्ये ७ हजारांच्या दरम्यान मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रुपये भाव होता. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. सोयापेंड आणि सोयातेलाला उठाव असल्याने भावात तेजी आली आहे. सोयाबीनच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .कापसाला उठावकापसाच्या भावातील तेजी कायम आहे. पाॅलिस्टरच्या भावात वाढ झाल्यानंतर कापसालाही उठाव मिळत आहे. रुईची निर्यातही चांगली सुरु आहे. तसेच सरकीचे भावही तेजीत आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर उचांकी भाव १० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची मागणी पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचा भाव तेजीतच राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Akola Soybean Price: अकोला बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी दर.हरभरा दबावातचदेशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहे. हरभऱ्याच्या सरासरी भावात काहीशी सुधारणा दिसत असली तरी भावातळी हमीभावाच्या खालीच आहे. हमीभावाने हरभरा खरेदी उद्दीष्ट पूर्ण झाल्यामुळे थांबली आहे. याचा परिणाम हरभरा दरावर दिसून येत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभरा बाजारातील आवक सध्याही चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर दिसून येत आहे. हरभरा दरावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: हरभरा दबावातच; सोयाबीन तेजीतच; कापूस टिकून, तूर स्थिरावली तर टोमॅटोत सुधारणा.कांदा भाव दबावातदेशातील बाजारात कांदा भाव दबावात आहेत. कांद्याचा सरासरी भाव बहुतांशी बाजारांमध्ये १ हजारांच्याही खाली गेला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याला बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी १०० रुपये प्रतिक्विंटलपासून भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक सध्या वाढलेली आहे. तर बाजारातील सरासरी भावपातळी प्रतिक्विंटल ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कांद्याची आवक पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.