Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारमहाराष्ट्र सरकारची हमीभावाने सोयाबीन खेरदीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही काहीशी सुधारणा दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी वाढवले. तर बाजार समित्यांमध्ये एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचा भावही १०० रुपयांपर्यंत सुधारलेला दिसत आहे. सोयाबीनला आजही बाजारात सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ओलावा अधिक असलेल्या सोयाबीनचा भाव आजही ४ हजारांच्या कमीच आहे. हमीभावाने नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हमीभावानेच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. .कापूस स्थिरावलाकापसाचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. कापसाची बाजारातील आवक सुधारत आहे. दुसरीकडे सीसीआयची खरेदीही सुरु आहे. मात्र कापसाचा ओलावा अधिक असल्याने गरजू शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विकाला लागत आहे. त्यातच आयात कापसाचा दबावही दरावर आहे. कापसाची खरेदी आजही खुल्या बाजारात ६५०० ते ७ हजारांच्या दरम्यान होत आहे. सीसीआयची खरेदी वाढल्यानंतर बाजारात दरात सुधारणा दिसू शकते. मात्र कापसाचा बाजारभाव हमीभावापुढे लगेच जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने कापसाची विक्री करावी, असा आवाहन जाणकारांनी केले आहे..Cotton Market: खानदेशात कापसाची आवक अल्प.गाजराला उठावराज्यातील बाजारात गाजराला सध्या चांगला उठाव आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे. गाजराची बाजारातील आवक सध्या मर्यादीत दिसत आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमधील आवक कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक बाजार समित्यांमधील आवक अधिक दिसत आहे. मागणी असल्याने सध्या गाजर २ हजार ते २५०० रुपयाने विकले जात आहे. पुढील काळातही बाजारातील गाजराची आवक मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाजराचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..Sugar Producers Protest: राज्यात ऊस उत्पादकांकडून प्रति टन कपातीला विरोध.जिऱ्याचे भाव टिकूनदेशातील बाजारात जिऱ्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. ऑक्टोबर महिन्यात जिऱ्याला दिवाळीची मागणी राहीली. त्यामुळे दरालाही आधार मिळाला. देशातील जिऱ्याचे उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यापुढील काळात जिऱ्याला लग्नसराईमुळे मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. सध्या जिरा प्रतिक्विंटल सरासरी १७ हजार ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. तर राज्यातील बाजारात २२ हजार ते २५ हजार रुपये भाव आहे. जिऱ्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..टोमॅटोचे दर टिकूनराज्यातील बाजारात टोमॅटोचे दर टिकून आहेत. मागील आठवडाभरात दरात काहीसे चढ उतार दिसले. मात्र सरासरी दरपातळी मोठ्या प्रमाणात बदलली नाही. बाजारातील टोमॅटोची आवक काहीशी कमी दिसत आहे. पावसाचा टोमॅटो पिकाला फटका बसतच आहे. बाजारात सरासरी १२०० ते १४०० रुपयाने टोमॅटो विकला जात आहे. तर एक नंबर माल १८०० ते २ हजारांपर्यंतही काही बाजारात विकला जात आहे. तर किमान भाव अगदी ७०० ते ८०० रुपयांपासून सुरु होत आहे. टोमॅटोच्या दरात पुढील काळातही काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.