Market Bulletin: सोयाबीन टिकून सोयाबीनचा भाव मागील दोन दिवसांपासून टिकून आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे. सोयापेंडला सद्या उठाव चांगला आहे. तर उपलब्धता कमीच आहे. यामुळे सोयाबीनचा भाव सध्या तेजीत आहे. आज सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भावही ७ हजार २०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही बाजारातील सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसाला उठाव कापसाचा भाव आज स्थिरावला होता. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. सध्या सीसीआयकडे कापसाचा जास्त स्टाॅक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्यानंतर सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव नुकताच खंडीमागे ७०० रुपयाने कमी केला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढल्याने दर स्थिरावला आहे. आज कापूस बाजारात ८ हजार ४०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला गेला आहे. कापसाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार सोडले तर भावपातळी काहीशी स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Monsoon In Kerala 2026 : मॉन्सून २४ तासात केरळात दाखल होणार; राज्यात वादळी पावसाचा इशारा.कारले स्थिरावलेराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी असल्यामुळे भाजीपाला भावात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कारल्याची आवकही गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे. तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे. याचा आधार कारल्याच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. पुढील काळात आवकेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरपातळी टिकून राहण्यास मदत होईल, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले; कापूस आवक कमीच, कांदा आज टिकून, टोमॅटो भावात सुधारणा तर तुरीची आवक कमीच.हरभरा भावात सुधारणा देशातील बाजारात बाजारात हरभरा भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली आहे. बाजारातील हरभरा आवकही कमी झाली आहे. युध्दामुळे आयातीवरही परिणाम होत आहे. याचा आधार हरभऱ्याच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात बाजारतील हरभरा आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधारही हरभरा भावाला मिळेल. यामुळे दर टिकून राहण्यास मदत होईल, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .तूर दबावातचदेशातील बाजारात हरभरा आणि इतर कडधान्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. मात्र तुरीचा बाव दबावात आहे. तुरीला बाजारात आजही हमीभावाच्या खालीच भाव मिळत आहे. तुरीची बाजारातील आवकही कमीच आहे. उत्पादनही घटलेले आहे. तरीही भावावर दबाव कायम आहे. आज बाजारात तूर प्रतिक्विंट सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काळात देशातील तुरीची लागवड आणि बाजारातील आवकेतील चढ उताराचा दरावरही परिणाम दिसू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.