Market Bulletin: कापूस दर स्थिरदेशातील बाजारात आज कापूस भाव स्थिरावले होते. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. तर कापसाला असलेला उठाव आजही चांगला आहे. कापसाला बाजारात आज प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपसाचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये चढ उतार सोयाबीनच्या भावात आज काही बाजारांमध्ये काहीसे चढ उतार दिसून आले होते. बाजारातील सोयबीनची आवक कमीच आहे. प्रक्रिया प्लांट्सनीही सोयाबीनच्या भावात काहिशी घट केली होती. बाजार समित्यांमध्ये मात्र दर स्थिर होते. सोयाबीनला बाजारात आज प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकले जात आहे. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस याच पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Wheat Export Quota: गव्हाच्या निर्यातीचा कोटा दुप्पट होण्याची शक्यता.हरभरा दबावातचदेशातील बाजारत हरभऱ्याची आवक चांगली सुरु आहे. हरभरा उत्पादन यंदा वाढल्याने बाजारावर आवकेचा दबाव आहे. हमीभावाने सुरु असलेली राज्यातील खरेदी बारदाणा टंचाईमुळे बहुतांशी भागात ठप्प झाली आहे. या सर्व कारणांनी हरभरा भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा दरही या पातळीच्या दरम्यान स्थिरावू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Turmeric Price Issue: हळदीचे दर 'जैसे थे'; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ.शेवगा स्थिरावलाराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक वाढली होती. तर शेवग्याला मिळणारा उठाव मात्र स्थिर आहे. तसेच इतर भाजीपाल्याचे भावही सध्या कमीच आहेत. त्यामुळे शेवग्यावरही दबाव आहे. सध्या बाजारात शेवगा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजाराने विकला जात आहे. बाजारातील शेवग्याची आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामळे शेवग्याचा भावही सध्याच्या पातळीच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले. .ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.