Market Bulletin: सोयाबीन तेजीतच आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीनचा भाव तेजीत आहे. सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दीड वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. तर देशातील बाजारातही दोन वर्षातील उचांकी भाव सोयाबीनने गाठला आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन १२.३० डाॅलर प्रतिबुशेल्सने विकले जात आहे. सोयाबीनच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस टिकून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. कापसाचा भाव ८६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचला आहे. कापसाचा हा भाव गेल्या दीड वर्षातील उचांकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा देशातील बाजारालाही आधार मिळत आहे. देशातील बाजारात सध्या कापसाची विक्री ८ हजार ७०० ते ९ हजारांच्या दरम्यान होत आहे. काही बाजारात उचांकी १० हजारांचा भाव आजही मिळाला. पण खूपच कमी माल या भावात विकला जात आहे. कापसाच्या भावातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Banana Price: अकोल्यात आठवड्याभरात केळी दरात ५०० रुपयांची वाढ.हरभरा दबावातचदेशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहे. हरभऱ्याच्या सरासरी भावात काहीशी सुधारणा दिसत असली तरी भावातळी हमीभावाच्या खालीच आहे. हमीभावाने हरभरा खरेदी उद्दीष्ट पूर्ण झाल्यामुळे थांबली आहे. याचा परिणाम हरभरा दरावर दिसून येत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभरा बाजारातील आवक सध्याही चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर दिसून येत आहे. हरभरा दरावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: हळदीचा भाव स्थिर; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसातील तेजी टिकून, लिंबू आवक घटली तर काकडीला उठाव.तूर स्थिरावलीदेशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपास पोचला आहे. पण दरपातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसत आहे. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसत आहे. तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसत आहे. सध्या तूर बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभुमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .टोमॅटोत सुधारणामागील दोन आठवड्यांपासून बाजारीतल टोमॅटोची आवक कमी होत गेली आहे. वाढत्या उष्णतेचा टोमॅटोच्या पिकाला फटका बसत आहे. ऊन मोठ्या प्रमाणात वाढल्याने तोडा कमी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा परिणाम टोमॅटोच्या आवकेवर होत असून उठाव मात्र टिकून आहे. यामुळे टोमॅटोच्या भावाता सुधारणा झाली असून सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे सरासरी १७०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार टोमॅटोच्या भावाला मिळेल, असा अंदजा टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.