Market Bulletin: सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव काहीसा स्थिरावला होता. सोयाबीनला बाजारात सध्या ७ हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. सरासरी भावपातळी ६ हजार ७०० ते ७ हजारांच्या दरम्यान आहे. सोयाबीनला सध्या बाजारात उठाव चांगला आहे. तर पुरवठा कमी आहे. सरकारचे सोयाबीनही चांगल्या भावात विकले जात आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ७ हजार १०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसात चढ उतारकापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारांमधील भावात आज काहीशी नरमाई पाहायला मिळाली. तराही सरासरी दरपातळीत फार घट झाली नाही. सीसीआयच्या कापसाला उठाव चांगला आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव वाढवलेला आहे. पाॅलिस्टरचे भाव वाढल्यामुळे कापसाला चांगला उठाव मिळत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. त्यामुळे कापसाचा भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Edible Oil Market: खाद्यतेलांत दीर्घकालीन तेजीचे संकेत कायम.हरभरा दबावातचदेशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहे. हरभऱ्याच्या सरासरी भावात काहीशी सुधारणा दिसत असली तरी भावातळी हमीभावाच्या खालीच आहे. हमीभावाने हरभरा खरेदी उद्दीष्ट पूर्ण झाल्यामुळे थांबली आहे. याचा परिणाम हरभरा दरावर दिसून येत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभरा बाजारातील आवक सध्याही चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर दिसून येत आहे. हरभरा दरावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली.लिंबू दरात नरमाईराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. बाजारातील लिंबाची आवक मात्र कमीच आहे. तरीही लिंबाचा भाव काहीसा नरमला आहे. वाढलेल्या उन्हामुळेही मागणी वाढलेली आहे. सध्या बाजारात लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हाचा लिंबू पिकावर परिणाम दिसून येत आहे. लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..मोहरीच्या भावात तेजीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मोहरीच्या भावातही तेजी आली आहे. मोहरीचे भाव तेल आणि पेंडेला मागणी असल्यामुळे वाढले आहेत. मोहरी पेंडेला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहेत. सरकारने यंदा मोहरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार २०० रुपये जाहीर केला होता. तर बाजारात सध्या मोहरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मोहरीची बाजारातील आवक सुरु असतानाही मोहरीच्या भावात तेजी आहे. मोहरीच्या भावातील सुधारणा पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.