Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, मिरची आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे मागील दोन आठवड्यांपासून १२ डाॅलरच्यावर टिकून आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १२.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते.

तर देशात प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ७५० ते ४ हाजर ८५० रुपयांच्या दरम्यान होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावात; कापूस, सोयाबीन, गहू, आले यांचे दर काय आहेत?

कापसाच्या वायद्यांमध्येही चढ उतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारी ७६.५६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ८४० रुपये प्रतिखंडीवर होते.

बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र टिकून आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील कापसाची भावपातळी स्थिर दिसते. कापसाचे भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याचा अंदाज आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Maize Market : खानदेशात मका आवकेत घट, दरात किंचित वाढ

बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी आणि उठाव मात्र चांगला दिसतो. त्यातच लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगली मागणी येत आहे.

यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

टोमॅटोच्या भावातील नरमाई मागील काही दिवसांपासून कायम आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये आता एक हजार रुपयांच्याच घरात आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.

टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com