Balck Gram : उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा

देशात यंदा उडदाची पेरणी ६ टक्क्यांनी घटलीय. तसेच पावसामुळे प्रमुख राज्यांत पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे बर्मामधून स्वस्त उडीद आयात होण्याची शक्यता आहे.
Black Gram
Black GramAgrowon
Published on
Updated on

उत्पादन घटूनही टोमॅटो दर कमीच

1. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या टोमॅटोची आवक कमी होतेय. पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटोचं उत्पादन घटलंय. मात्र तरीही बाजारात सध्या टोमॅटोचे दर काहीसे नरमलेले आहेत. राज्यात टोमॅटोला सध्या सरासरी १७०० रुपये प्रक्विंटल दर मिळतोय. पुणे बाजार समितीत सरासरी १६०० रुपयाने टोमॅटोचे व्यवहार होत आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १८०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात टोमॅटो आवक कमी झाल्यास दर काही प्रमाणात सुधारू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

Black Gram
Wheat : जगाची भूक भागवणारा भारत स्वतःचं कसं भागवणार?

वाढत्या आवकेमुळे कांद्याचे दर दबावात

2. राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर दबावाखाली आहेत. सध्या राज्यात कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. नाशिक जिल्हा कांद्याचं कोठार म्हणून प्रसिध्द आहे. जिल्ह्यात सरासरी ५०० ते १७०० रुपयाने कांद्याचे व्यवहार होत आहेत. लासलगाव मार्केटला आज कांद्याला सरासरी १२०० रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात १३०० रुपये दर मिळाला. वाढत्या आवकेमुळे पुढील काही दिवस दर सुधारण्याची चिन्हे नाहीत. यंदा रब्बी आणि उन्हाळी कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला. त्यामुळे पुरवठा दाटून दर दबावात आले. त्यातच चाळीत कांदा खराब होतोय. त्यामुळं शेतकरी माल बाजारात आणण्याची घाई करत आहेत. आवकेचा रेटा वाढल्यामुळे दर घसरले आहेत.

Black Gram
Green Gram : देशात मुगाचा पेरा का वाढतोय?

कमी पुरवठ्यामुळे मुगाचे दर तेजीत

3. देशातील काही बाजारांमध्ये नवीन मुगाची आवक सुरु झाली आहे. राज्यातही सोलापूर, लातूर आणि जालना बाजारसमित्यांमध्ये मूग विक्रीसाठी आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. यंदा पावसामुळं मुगाचं मोठं नुकसानं झालंय. त्यामुळे मुगाच्या दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. देशात मंगळवारी मुगाचा सरासरी भाव ७ हजार ७०० रुपये होता. इंदोर बाजारात मुगाला ७ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर लातूर बाजार समितीत सरासरी ७ हजार ६०० रुपयाने व्यवहार झाले. जळगाव बाजारात मुगाला सर्वाधिक ८ हजार २०० रुपये दर मिळाला. बाजारातील सध्याची स्थिती पाहता मुगाला ८ हजार रुपये दर मिळाल्यास विक्री करण्यास हरकत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

Black Gram
Tomato : वरूडकाजी, हिरापूर झाले टोमॅटो, कारल्याचे ‘क्लस्टर’

4. देशात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. लातूर बाजारसमिती तुरीसाठी देशात प्रसिध्द आहे. इथे तुरीला किती दर मिळतो, यावकडे देशभरातील व्यापाऱ्यांचं लक्ष असतं. लातूरमध्ये सध्या तुरीला सरासरी ८ हजार रूपये क्विंटल दर मिळतोय. तर अकोला बाजारात ७ हजार ८०० रुपयाने व्यवहार होत आहेत. तर दुसरीकडे आयात तुरीचा दरही ८ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. बर्मातून आयात होणारी तूर सर्व खर्चांसह प्रति क्विंटल ८ हजार ५० रुपयांना पडते. त्यामुळे तुरीच्या दरातील वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.

उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा

5. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात यंदाच्या खरिपात उडदाची लागवड (Black Gram Cultivation) ६ टक्क्यांनी कमी झाली. तसेच मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही भागांत उडीद पिकाला पावसाचा फटका (Rain Hit Black Gram) बसला. तर उत्तर प्रदेशात काही भागांमध्ये पाऊस आणि काही ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रातही उडीद पिकाचं नुकसान (Crop Damage) झालंय. मात्र काही भागांमध्ये पिकाला अनुकूल स्थिती असल्याचं सांगितलं जातयं. मागील आठवड्यापर्यंत देशात उडदाच्या बाजारात तेजीत होती. मात्र बर्मानं आपल्या क्यात चलनाचं अवमूल्यन केलंय. त्यामुळे बर्मातून भारतात उडदाची स्वस्तात आयात होऊ शकते. बर्मा हा भारताला उडीद पुरवणारा महत्वाचा देश आहे. त्यामुळे देशात सध्या उडदाचे दर स्थिरावले आहेत. पुढील काळात देशातील खरीप उत्पादन आणि आयात माल यामुळे पुरवठा वाढेल. त्यामुळे दर दबावाखाली येऊ शकतात.

सध्या देशातील प्रमख बाजारसमित्यांमध्ये उडदाला सरासरी ८ हजार ३०० रुपये दर मिळतोय. महाराष्ट्रात उडदाची अजून मोठी आवक सुरू झालेली नाही. सध्या अगदी तुरळक माल बाजारात येतोय. सरासरी दर ८ हजार २०० रुपयांवर आहे. पुणे बाजारात ८ हजार ८०० रुपये तर सोलापूर बाजारात ८ हजार रुपयांनी उडदाचे व्यवहार झाले. सध्याचा दर हमीभावापेक्षा दीड हजार रुपयाने अधिक आहे. शेतकऱ्यांनी या भावपातळीवर नजर ठेऊन विक्रीबद्दलचा निर्णय घ्यावा, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com