Market Bulletin: सोयाबीन भाव टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा अधिक झाला आहे. तरीही बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. सध्या बाजारात सोयाबीन ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन सोयाबीन खरेदीचे भाव ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस तेजीतचकापसाच्या भावात झालेली वाढ कायम आहे. कापसाला सध्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. तर कापसाची बाजारातील आवक कमी झालेली आहे. पाॅलिस्टरच्या भावात झालेली वाढ कायम असल्याचाही आधार कापसाच्या भावाला मिळत आहे. कापसाला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आहेत. सरकीलाही उठाव कायम आहे. यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Hapus Mango Price: हापूस ५०० ते ७०० रुपये डझन.पपईला मागणीपपईला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे पपईला पसंती मिळत आहे. उन्हाचा चटका वाढल्यापासून पपईच्या भावात काहीशी वाढही दिसून आली आहे. सध्या पपईला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते २ हजार रपये भाव मिळत आहे. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे. पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..Soybean Price: सोयाबीनचे भाव सहा हजारांच्या पुढे.उन्हामुळे काकडीला उठावकाकडीलाही सध्या बाजारात चांगला उठाव मिळत आहे. तर दुसरीकडे काकडीची आवक स्थिरावली आहे. तर काही बाजारांमधील आवक कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या काकडीचा प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ४०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काकडी पिकाला वाढत्या उन्हाचा फटकाही बसत आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काकडीची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..हळदीची आवक वाढलीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसत आहे. सध्या बाजारात हळद प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारात आवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.