Market Bulletin: सोयाबीनमध्ये सुधारणा सोयातेल आणि सोयापेंडला आधार मिळत आहे. सोयातेलाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. याचा आधार सोयाबीनच्या भावाला मिळत आहे. सोयाीबनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ७०० ते ५ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक सध्या कमी झालेली आहे. याचाही आधार सोयाबीनला मिळत आहे. सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसात चढ उतारदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापसाची बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा अधिक दिसत आहे. तर युध्दाचा कापसाच्या मागणीवर परिणाम दिसत आहे. यामुळे कापसाच्या भावावर दबाव दिसून येत आहे. सध्या बाजारात कापूस सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाच्या भावावर सीसीआयच्या कापूस विक्रीचाही दबाव आहे. यामुळे कापूस भाव पुढील काही दिवस दबावातच राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Pomegranate Farmer Issue: हस्त बहरातील डाळिंबाच्या ५० टक्के बागा संकटात.आल्याचे भाव टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आल्याचे भाव टिकून आहेत. बाजारातील आल्याची आवक मर्यादीतच आहे. तर दुसरीकडे आल्याला मागणी आहे. लग्नसराई आणि रमजानमुळे आल्याला उठाव मिळत आहे. यामुळे आल्याचा भाव बाजारात सध्या ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे स्थिर राहण्याची सक्यता आहे. तर आल्याला उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. यामुळे आल्याचे भावही टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: खरबुजाला चांगला उठाव; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापूस भाव दबावातच, कोथिंबीरला उठाव तर मक्याला संथ उठाव.केळीला उठावराज्यातील बाजारात सध्या केळीला चांगला उठाव मिळत आहे. केळीची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. यंदा पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा केळीला फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर रमजान महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळत आहे. गुणवत्तेची केळी चांगलाच भाव खात आहे. सध्या बाजारात केळी प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ४०० ते २ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. आखाती देशांमध्ये केळीची निर्यात बंद झाली आहे. याचा परिणाम दरावर दिसत आहे. केळीचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .गवारचे भाव तेजीतराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून गवारचे भाव तेजीतच आहेत. गवारला बाजारात मागणीही चांगली आहे. गवार उत्पादनालाही यंदा बदलत्या वातावरणाचाही फटका पिकाला बसत आहे. त्यातच लागवडही कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने गवारच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. गवारचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.