Market Bulletin: कापसात काहिशी सुधारणादेशातील अनेक बाजारात मागील तीन दिवसांमध्ये कापूस बाजारात काहिशी नरमाई पाहायला मिळाली. पण आज बाजारात सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव ७५ सेंट प्रतिपाऊंडच्या पुढे सरकाला आहे. तर देशात कापसाचा भाव सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. कापसाला देशात सध्या चांगला उठाव आहे. यामुळे दरवाढ कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनला उठावदेशातील बजारात मागील दोन दिवसांपासून सोयाबीनच्या भावातील चढ उतार थांबले असून भाव पातळी स्थिरावली आहे. सोयाबीनला देशातील बहुतांशी बाजारांमध्ये चांगली मागणी आहे. तर दुसरीकडे आवक कमी झालेली आहे. युध्दामुळे तेलाचे भाव वाढलेलेच आहेत. त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Food Processing Success: अन्न प्रक्रिया उद्योगात कोल्हापूरचा देशात डंका!.तुरीच्या भावात चढ उतारदेशातील बाजाराता तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहिसे चढ उतार दिसून आली आहेत. स्थानिक बाजारातील आवकही सरासरीच्या तुलनेत कमी दिसत आहे. तरीही तुरीला उठावही चांगला आहे. असे असले तरीही तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. तुरीला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची आयातही सुरु आहे. तुरीचा भाव काही दिवस स्थिर राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .India Cotton Market: कापसाकडे कल, पण आव्हाने कायम.पपईला मागणीवाढत्या उन्हामुळे पपईला सध्या चांगली मागणी आहे. मागील काही दिवसांमध्ये पपईच्या भावातही काहिशी वाढ झाली आहे. पपईची बाजारातील आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याचा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या पपईला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते २ हजार रपये भाव मिळत आहे. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे. पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..टोमॅटोवरील दबाव कायमराज्यातील बाजारात टोमॅटोची आवक चांगली सुरु आहे. राज्यातील अनेक भागात टोमॅटोचा तोडा सुरु असल्याने आवक जास्त दिसत आहे. तर बाजारात टोमॅटोला मिळणारा उठाव टिकून आहे. आवकेचा दबाव असल्याने भावावरील दबावही कायम आहे. सध्या बाजारात टोमॅटो प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १२०० रुपयाने विकला जात आहे. बाजारातील टोमॅटोची आवक चांगली असल्यान पुढील काही दिवस भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.