Market Bulletin: सोयाबीन दरात सुधारणादेशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दर टिकून आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढवला होता. तर बाजार समित्यांमध्येही काहीशी सुधारणा झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव सरासरी ६ हजार ४०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार १५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनच्या भावातील सुधारणा पुढील काही दिवस कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसाला उठावदेशातील बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला उठाव आहे. कापसाच्या भावात झालेली वाढ टिकून आहे. सीसीआयकडे कापसाचा चांगला साठा आहे. त्यामुळे सीसीआयने कापूस विक्रीचा भाव वाढवला आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव खंडीमागे मागील दोन महिन्यांमध्ये ९ हजार रुपयाने वाढवला आहे. तर बाजारात कापसाला गुणवत्तेप्रमाणे ८ हजार २०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची बाजातील आवक कमीच झालेली आहे. देशातील उत्पादन कमी असल्याचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. कापसाच्या भावातील सुधारणा काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Turmeric Prices Drop: हळदीचे ‘पॅनिक सेंलिंग’ टाळण्याची गरज.गव्हाची आवक वाढलीराज्यातील बाजारात मागील आठवड्यापासून गव्हाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरावर दबाव दिसून येत आहे. परंतु उच्च गुणवत्तेच्या गव्हाला उठावही चांगला आहे. उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा गहू पिकाला फटका बसला आहे. तर देशातील सरासरी उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. सध्या गव्हाला राज्यातील प्रमुख बाजारात प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. तर चांगल्या गव्हाला ३ हजारांपर्यंत दर मिळत आहे. परंतु चांगल्या दर्जाच्या गव्हाची आवक कमी आहे.पुढील काळातही गव्हाची आवक कायम राहू शकते. त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत..Turmeric Seed Prices: हळद बियाणे प्रति क्विंटल ५५०० ते ६००० रुपये.बाजरी दरात सुधारणाराज्यातील प्रमुख बाजारात मागील आठवड्याभरात आवक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे बाजरीची मागणी कमी झाली आहे. परंतु आवक कमी असल्याने प्रमुख बाजारात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत १०० रुपयांनी सुधारणा दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख बाजारात बाजरीला सरासरी प्रति क्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. तर चांगल्या गुणवत्तेचं बाजरीला काही बाजारात ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात बाजरीची आवक कमीच राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे बाजरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी दिला आहे..शेवगा दरात चढ-उतारराज्यातील बाजारात शेवग्याची आवक स्थिर आहे. तर शेवग्याचा उठाव मात्र कायम आहे. परंतु तीव्र उन्हामुळे भाजीपाला बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. त्यामुळे शेवगा दरात चढ-उतार दिसून येत आहेत. सध्या बाजारातील शेवग्याला सरासरी प्रति क्विंटल २ हजार ते ३ हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे बाजारात आवक स्थिर राहण्याचा अंदाज आहे. परंतु उन्हाचा पारा चढत असल्याने शेवगा दरात चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.