Market Bulletin: सोयाबीनचे दर टिकूनमागील दोन दिवस सोयाबीनच्या भावात काहिसे चढ उतार दिसून आले होते. त्यानंतर आज सोयाबीनचे भाव काहिसे स्थिरावले होते. सोयाबीनला सध्या उठाव चांगला आहे. तर बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. सध्या सोयाबीनला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनला उठाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .कापसात चढ उतारकापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. कच्च्या तेलाच्या भावातही चढ उतार सुरु आहेत. यामुळे कापूस भावावर परिणाम दिसत आहे. बाजारातील कापसाची आवक सध्या कमी झालेली आहे. तर उठाव चांगला आहे. त्यामुळे कापूस प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस भाव काही दिवस स्थिर राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; मक्यात काहिशी सुधारणा,गव्हाचे भाव स्थिरावले तर कैरीला काकडीला उठाव.हरभरा भाव दबावातचदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा भाव दबावातच आहेत. देशातील बाजारात सध्या आवक चांगली सुरु आहे. आवकेचा दबाव बहुतांशी बाजारांवर आहे. देशात यंदा हरभरा उत्पादनही वाढले आहे. यामुळे सध्या हरभऱ्याला बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील हरभऱ्याची आवक चांगली सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..kolhapur Jaggery Market: कोल्हापुरात गूळ सौदै नियमित.गहू आवक वाढलीदेशातील बाजारात गव्हाची आवक वाढत आहे. यंदा गव्हाचे उत्पादन चांगले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गव्हाला मागणी स्थिर आहे. सध्या बाजारावर गहू आवकेचा दबाव आहे. यामुळे सध्या हमीभावापेक्षा कमी भावात गव्हाची विक्री होत आहे. यंदा सरकारने गव्हासाठी २ हजार ५८५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर बाजारात गहू २२०० ते २७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. गव्हाच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..हळद टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचा भाव स्थिरावला आहे. दुसरीकडे हळदीची काढणी वेगाने सुरु असून बाजारातील आवकही सुधारणात आहे. हळदीला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. यंदा हळदीचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा काहीसे वाढल्याचा अंदाज आहे. मात्र पावसाचा हळद पिकाला फटका बसला आहे. आवकेचा दबाव पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.