Market Bulletin: कापसाला मागणी देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावात सुधारणा कायम आहे. कापूस खंडीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी सीसीआयने वाढवले आहेत. सीसीआयने आतापर्यंत कापूस खंडीचे विक्रीचे भाव ६५०० रुपयाने वाढवले आहेत. बाजार समित्यांमधील कापसाची आवकही कमी झालेली आहे. मात्र कापूस भाव ८ हजार ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकीलाही उठाव कायम आहे. यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकून देशातील बाजारात सोयाबीनला चांगला उठाव आहे. तर सोयाबीनची बाजारातील आवक कमी झालेली आहे. सध्या सोयातेल आणि सोयापेंडेला असलेल्या मागणीमुळे भाव हमीभावाच्या पुढे आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. तर बाजारातील सोयाबीनची आवक कमी होणार आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजारही टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Khandesh Maize Market: खानदेशात मका आवकेत वाढ.कांदा दबावातचबाजारातील कांद्याची आवक वाढलेली आहे. आवकेच्या दबाव भावावर असल्याने कांद्याचा भाव दबावात आला आहे. सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मळत आहे. राज्यातील महत्वाच्या कांदा उत्पादक बाजार समित्यांमधील आवक वाढलेली आहे. त्यामुळे भाव अगदी ४०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भाव ५०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील कांदा आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कापसाचा वाढलेला भाव टिकून; हरभरा आवक वाढली, तूर दबावातच, सरकीचे दर टिकून तर पपईला मागणी.जिरा भाव नरमलाजिऱ्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहिसी नरमाई दिसून आली. नव्या जिऱ्याची काढणी सुरु झालेली आहे. उंजासह महत्वाच्या बाजारांमध्ये जिरा आवक वाढत आहे. याचा दबावा दरावर आला आहे. तसेच निर्यातही कमी होत आहे. त्यामुळे सध्या जिरा प्रतिक्विंटल सरासरी १८ हजार ते २२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे विकला जात आहे. जिऱ्याचे उत्पादन यंदा कमी झालेले आहे. मात्र गेल्यावर्षीच्यात तुलनेत जिऱ्याला यंदा चांगला भाव असल्याने शेतकरी मालाची काढणी झाल्यानंतर बाजारात आणत आहेत. जिऱ्याचा भाव पुढील दिवस काहिसा दबावात राहू शकतो, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .खरबुजाची आवक वाढलीराज्यातील बाजारात खरबुजाची आवक वाढली आहे. खरबुजाला वाढत्या उन्हामुळे मागणीही चांगली आहे. वाढत्या आवकेचा खरबुजाच्या भावावरही दबाव दिसून येत आहे. खरबुजाला सध्या बाजारात सरासरी १४०० ते १७०० रुपयांचा भाव मिळत आहे. खरबुजाला पुढील कालातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारातील आवक पाणीटंचाईमुळे पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे दरालाही आधार मिळेल, असा अंदाज फळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.