Edible Oil Import : देशात विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेल आयात; कमी भावामुळे निर्यातीवरील खर्च कमी

Oil Market Price : आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्येतलाचे भाव गेल्या वर्षभरात कमी होते त्यामुळे आयातीवरील खर्चही कमी झाला,
Edible Oil Prices
Edible Oil Pricesagrowon

Edible Oil Prices : भारतात विक्रमी खाद्यतेल आयात झाली आहे. नुकत्याच संपलेल्या तेल विपणन वर्षात १६५ लाख टनांची आयात झाली. पण आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्येतलाचे भाव गेल्या वर्षभरात कमी होते त्यामुळे आयातीवरील खर्चही कमी झाला, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालातून स्पष्ट झाले.

Edible Oil Prices
Edible Oil Prices : सणासुदीत खाद्यतेलाचे भाव वाढणार? कमी पावसाने सोयाबीन पिकावर परिणाम

तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात देशात विक्रमी १६५ लाख टनांची आयात झाली. मागील हंगामात याच काळातील आयात १४० लाख टनांच्या दरम्यान होती. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामात २५ लाख टनांनी आयात जास्त झाली.

२०२२-२३ च्या वर्षात आयातीवर १ लाख ३८ हजार कोटींचा खर्च झाला. तर मागीलवर्षी म्हणजेच २०२१-२२ या वर्षात आयातीवरील खर्च १ लाख ५६ हजार कोटी झाला होता. म्हणजेच खाद्यतेल आयातीवरील खर्च जवळपास १८ हजार कोटींनी कमी झाला. मात्र आयात २५ लाख टनांनी जास्त झाली. याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात झालेली घसरण. मागील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात सतत घसरण होत गेली. कमी झालेले भाव आणि खाद्यतेलाची उपलब्धता यामुळे भारतात खाद्यतेलाची आवक वाढली. यामुळे आयात २५ लाख टनांनी जास्त झाली.

Edible Oil Prices
Edible Oil Import : सरकारने रिफाईंड सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी का केले?

देशातील खाद्यतेलाचा स्टाॅक जास्त

मागील वर्षात खाद्यतेल आयात जास्त झाल्याने दरमहिन्यात देशातील स्टाॅक जास्त राहीला. ऑगस्ट महिन्यापासून देशात दरमहिन्याला किमान ३० लाख टनांचा स्टाॅख होता. १ नोव्हेंबर २०२३ रोजी देशात खाद्यतेलाचा स्टाॅक ३३ लाख टनांच्या दरम्यान पोचला होता.

ऑक्टोबरमधील आयात काहीशी घटली


देशातील खाद्यतेलाचा स्टाॅक, आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारलेले भाव आणि उपलब्धतेतील काही अडचण यामुळे ऑक्टोबर महिन्यात खाद्यतेल आय़ात कमी झाली. ऑक्टोबर महिन्यात देशात जवळपास १० लाख टनांची आयात झाली होती. तर सप्टेंबर महिन्यातील आयात १५ लाख टन होती. २०२२ मधील ऑक्टोबरचा विचार केला तर आयात जवळपास १४ लाख टनांच्या दरम्यान होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com