Nagar APMC : नगर बाजारात झेंडूला मिळाला ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दर

दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांना चांगली मागणी असते, मात्र सोमवारी (ता. २४) नगर येथील बाजारात फुलांचे दर पडलेले होते.
Flower
FlowerAgrowon

नगर ः दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांना (Flower Market) चांगली मागणी असते, मात्र सोमवारी (ता. २४) नगर येथील बाजारात फुलांचे दर पडलेले होते. झेंडू, अॅस्टर, शेंवतीला अधिक मागणी असते. झेंडूला ३० ते ५० रुपये, शेवंतीला ५० ते ८०, तर ॲस्टरला ७० ते १०० रुपयांचा ठोक विक्रीत दर (Flower Rate) मिळाला.

Flower
Nampur APMC : नामपूर बाजार समिती दहा दिवस बंद

एक तर पावसाने नुकसान झाले, सततच्या पावसाने उत्पादन घटले त्यात दरही पडल्याने यंदा नगर जिल्ह्यातील फूल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. नगर जिल्ह्यात नगर तालुक्यातील अकोळनेर, भोरवाडी, चास, कामरगावसह पारनेर, शिर्डी, शेवगाव, राहाता भागांत फुलांचे उत्पादन घेतले जाते. यंदा दसऱ्याला फुलांना बऱ्यापैकी दर मिळाला. मात्र त्यानंतर सतत पाऊस सुरू झाल्याने ऐन दिवाळीत फूल उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सोसावा लागला आहे. फुलांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने ७० टक्क्यापर्यंत फुलांचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजारात दरही मिळाला नाही.

नगर तालुक्यातून देशभरात फुले विक्री होतात. दिवाळीच्या काळात सर्वदूर भागातून व्यापारी फुलांची खरेदी करण्यासाठी नगरला येतात. यंदा मात्र व्यापारी आले नसल्याने स्थानिक पातळीवरही दर पडले. त्यामुळे यंदा उत्पादन घटूनही दर मिळाला नसल्याने फूल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. हे नुकसान सहज भरुन निघाणारे नाही असे सांगत फूल उत्पादक शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.

दिवाळीच्या काळात फुलांना चांगला मागणी तसेच दर मिळत असतो. यंदा पावसाने फुलांचे उत्पादन घटले, त्यात राज्य व बाहेर राज्यातून फुलांची खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी आलेच नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर फारसा दर मिळाला नाही. त्याचा फूल उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सोसावा लागला. हे नुकसान सहज भरून येणारे नाही.

- तुषार मेहेत्रे, फूल उत्पादक शेतकरी, अकोळनेर, ता. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com