नाशिक : नाशिक बाजार समितीच्या (Nashik APMC) मुख्य पंचवटी आवारात भाजीपाल्यासोबत प्लॅस्टिक क्रेटमध्ये कांदा (Onion) का आणला? येथे विकता येत नाही, आता दंड (Fine To Farmer) भर, नाहीतर माल उचलून नेऊ, अशी दमबाजी बाजार समिती कर्मचाऱ्याकडून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावर न थांबता ‘जागा फी पावती’ देत शेतकऱ्याकडून १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आमची लूट होत असल्याची कैफियत शेतकऱ्याने ‘ॲग्रोवन’कडे (Agrowon) मांडली आहे.
शेणीत (ता. इगतपुरी) येथील शेतकरी मंगेश जाधव यांनी मंगळवारी (ता. ७) रोजी चाळीत साठवून उरलेला दुय्यम प्रतवारीचा कांदा भाजीपाल्यासोबत बाजार समितीच्या मुख्य आवारात विक्रीसाठी आणला होता. मात्र, येथे कांदा का आणला? असा मुद्दा पुढे करून बाजार समिती कर्मचाऱ्याने अर्वाच्च भाषेत ‘आता दंड भर;नाहीतर कारवाई करू, कुणाकडेही जा काही फरक पडत नाही,’ अशी शेतकऱ्याला दमदाटी केली. अखेर कारवाई नको म्हणून दंड भरतो, अशी भूमिका शेतकऱ्याने घेतली; मात्र त्यापोटी ‘जागा फी पावती’ दिली जात असल्याचा प्रकार शेतकऱ्याने समोर आला आहे. भाजीपाला नियमनमुक्त असताना या प्रकारे लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांने केला.
कांदा बाजार स्वतंत्र असल्याने पंचवटी आवारात शेतकऱ्यांना कांदा विकता येत नाही. शेतकऱ्याने वारंवार कांदा आणल्यास समज देऊन कांदा आवारात नेण्यासाठी सांगितले जाते. मात्र, दंड वसूल केला जात नसल्याचे बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी स्पष्ट केले. भाजीपाला नियमनमुक्त आहे, अशा पार्श्वभूमीवर शेतकरी शेतमाल कोठेही विकू शकतो; मात्र आता भाजीपाला बाजारात कांदा विक्रीसाठी आणला म्हणून दंड वसुली करण्याचा प्रकार सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.