Crop Insurance : अकोला जिल्ह्यात आता पिकविम्याचा बीड पॅटर्न

यंदा हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना लागू करताना ‘बीड पॅटर्न’ राबवला जात आहे. खरीप पिकांचा ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरावा लागेल.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

अकोला ः यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) जिल्ह्यात पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) लागू झाली असून आता आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्श कंपनीची (ICICI Lombard General Insurance Company) नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कंपनीकडून हे काम काढून नव्याने देण्यात आले आहे.

यंदा हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना लागू करताना ‘बीड पॅटर्न’ (Beed Pattern) राबवला जात आहे. खरीप पिकांचा ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरावा लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा समिती राहणार आहे. यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हे सदस्य, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

Crop Insurance
पीकविमा १५ जुलैपासून चालू करण्याचा प्रयत्न

ही समिती हंगामात दर १५ दिवसांनी प्रत्येक पिकाचे पेरणीक्षेत्र, हवामान परिस्थिती, किडी व रोगाचा प्रादुर्भाव, पिकांच्या नुकसानीचा अहवाल अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला सादर करेल. वैयक्तिकस्तरावर पंचनामे करण्यासाठी यंत्रणेची नियुक्ती करेल. लाभार्थी तपासणीबाबत कार्यवाही करेल. सोबतच योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी या समितीवर राहणार आहे. तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल.

Crop Insurance
पीकविमा १५ जुलैपासून

सुकाणू समिती मदतीला

पीकविमा योजनेची अंमलबजावणी करताना पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी कृषी खात्याला अचूक व वेळेवर उपलब्ध होण्याच्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे नियोजन, अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी जिल्ह्यात सुकाणू समिती स्थापन केली आहे. यात निवासी उपजिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (विकास), सॅम्पल सर्वे संस्था प्रतिनिधी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी हे सदस्य तर जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

तालुक्यांनाही तक्रार निवारण समिती

योजनेबाबत स्थानिक स्तरावरील विविध लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण स्थानिक स्तरावरच होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती राहील. ही समिती तहसीलदारांच्या अध्यक्षतेत काम करेल. समितीत गटविकास अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी, अग्रणी बँक, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक प्रतिनिधी तसेच तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव राहतील.

खरीप हंगामातील पिके

ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com