Agriculture Commodity Market : मका जोमात; तुरीत घसरण

Tur Rate : तूर, सोयाबीन व मूग यांच्या किमती सध्या कमी होत आहेत. पुढील काही दिवस त्या हाच कल दाखवतील. १३ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
Maize Rate
Maize RateAgrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ७ ते १३ सप्टेंबर २०२४

मक्याची मागणी चांगली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत गेली काही वर्षे वाढीचा कल होता; तो या वर्षीही कायम राहण्याचा अंदाज आहे. तूर, सोयाबीन व मूग यांच्या किमती सध्या कमी होत आहेत. पुढील काही दिवस त्या हाच कल दाखवतील. १३ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

स्पॉट बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. किमतीत वाढता कल आहे. कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ३ टक्क्यांनी वाढून रु. ६०,१४० वर आले होते. या सप्ताहात ते ०.६ टक्क्याने कमी होऊन रु. ५९,७६० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भावसुद्धा ०.६ टक्क्याने घसरून रु. ५८,३६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.९ टक्क्यांनी कमी आहेत. नजीकच्या भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवतात.

NCDEX मध्ये या महिन्यात कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात रु. १,६१४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२२ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,६१५ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा फक्त ०.१ टक्क्याने अधिक आहेत.

कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्यूचर्स या हमीभावापेक्षा सुमारे रु. १०० ने अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. २,५५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,५५० वरच टिकून आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. २,५६८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स रु. २,६०० वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २ टक्क्यांना अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १४,४२४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. १४,४८४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १४,१४४ वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १४,५६८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.६ टक्क्याने अधिक आहेत.

Maize Rate
Turmeric Cultivation : हिंगोलीत हळद लागवडीत ८ हजार हेक्टरने वाढ

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ७,६७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्याने घसरून रु. ७,५५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.३ टक्क्याने घसरून रु. ८,२७५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. आवक वाढत आहे; किमती कमी होत आहेत.

Maize Rate
Soybean Purchase : हमीभावाने सोयाबीनची खरेदी करा

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्क्याने वाढून रु. ४,७९८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे; आवकसुद्धा कमी आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,२२९ वर आली होती. या सप्ताहात ती १.७ टक्क्याने घसरून रु. १०,०५५ वर आली आहे. ११ व १२ सप्टेंबर रोजी ती प्रथमच रु. १०,००० पेक्षा कमी झाली होती. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,८६५ होती; या सप्ताहात ती रु. ३,९१३ वर आली आहे. कांद्याच्या किमतीत वाढता तर आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com