Agriculture Market Bulletin:मका दरात चढ-उतारराज्यातील मका बाजारातील आजच्या आवकेत आणि दरात चढ-उतार पाहायला मिळाले. अचलपूर बाजारात आज सर्वाधिक ५ हजार ११० क्विंटल मक्याची आवक झाली असून, सरासरी दरात कोणताही बदल न होता २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव स्थिर राहिले होते. जामनेर बाजारात मक्याची आवक वाढून १ हजार ८९० क्विंटलवर पोहोचली. येथील सरासरी दरात तब्बल ५६० रुपयांची वाढ होऊन २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दुसरीकडे, अमरावती बाजारात १ हजार ३३६ क्विंटल आवक नोंदवली गेली असून, सरासरी दरात २ रुपयांच्या किरकोळ वाढीसह २ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. एकूणच पाहता, पोल्ट्री आणि उद्योगांकडून असलेल्या मागणीमुळे जामनेर व अमरावती बाजारपेठांमध्ये आवक वाढूनही मक्याच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र आहे..कापसाचे भाव टिकूनराज्यातील प्रमुख कापूस बाजारात आज आवकेत चढ-उतार दिसून आले, तरी दरात सुधारणा झाल्याचे चित्र आहे. राळेगाव बाजारात ४ हजार २०० क्विंटल कापसाची आवक झाली असून, सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन ९ हजार २०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सिंदी (सेलू) बाजारातही लांब स्टेपल कापसाची ६४७ क्विंटल आवक नोंदवली गेली आणि येथेही दर १०० रुपयांनी वाढून ९ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. तसेच, किल्ले धारूर बाजारात मध्यम स्टेपल कापसाची १ हजार ३०९ क्विंटल आवक झाली, मात्र येथील दरात कोणताही बदल न होता कापसाला ९ हजार ४५६ रुपये प्रति क्विंटल इतका स्थिर भाव मिळाला. एकूणच, राळेगाव आणि सिंदी (सेलू) बाजारांत कापसाचे दरात काहीशी वाढ होती, तर किल्ले धारूरमध्ये दर स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले..Soybean Price Increase: सोयाबीन बाजारभावात तेजी; सात हजारांचा टप्पा पार, शेतकऱ्यांना दिलासा!.टोमॅटो आवकेत नरमाईटोमॅटो बाजारात आज आवक कमी झाली, पण दोन बाजारांत भाव काहिशे वाढले होते. नागपूर बाजारात लोकल टोमॅटोची ५०० क्विंटल आवक स्थिर होती. बाजारातील सरासरी भाव ५० रुपयांनी वाढून १ हजार ८०० रुपये क्विंटलवर पोहोचला होता. चंद्रपूर-गंजवड बाजारातही कालच्या तुलनेत ५६ क्विंटलने आवक घटली असून, आज ३८६ क्विंटल मालाची आवक झाली. पण बाजारातील सरासरी भाव २०० रुपयांनी वाढून १ हजार २०० रुपये क्विंटलवर पोहोचले होते. तसेच, खेड-चाकण बाजारात ३८६ क्विंटल टोमॅटोची आवक झाली खरी, पण तेथील भावात काहीच बदल झाला नाही आणि दर १ हजार २०० रुपयांवरच टिकून राहिले होते. थोडक्यात सांगायचे तर, आज नागपूर आणि चंद्रपूरमध्ये टोमॅटोचे भाव वाढलेत, तर खेड-चाकणमध्ये भाव जागच्या जागीच स्थिर राहिलेत..Horticulture Production : देशातील फलोत्पादन ३८६.९२ दशलक्ष टनांवर पोहचण्याचा अंदाज; केंद्र सरकारचा दावा.लसूण दरात चढ-उतारराज्यातील लसूण बाजारातील आजच्या आवकेत वाढ नोंदवण्यात आली. नागपूर बाजारात लसणाची आवक १४० क्विंटलने वाढून आज ५६० क्विंटल झाली. सरासरी दरात कोणताही बदल न होता आजचा दर १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. तर, अकोला बाजारात २६० क्विंटल लसणाची आवक झाली असून येथे सरासरी दरात कोणताही बदल न होता १६ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच, अमरावती बाजारात लोकल लसणाची आवक कालप्रमाणेच आजही १०७ क्विंटल होती. मात्र, सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन आज १४ हजार ५०० रुपये भाव मिळाला. एकूणच पाहता, नागपूर आणि अकोला बाजारपेठांमध्ये लसणाचे सरासरी दर स्थिर राहिले, तर अमरावतीमध्ये दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले..सिताफळाच्या भावात घसरणराज्यातील सिताफळ बाजारात आज आवक कमी झाली असून, काही ठिकाणी दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोलापूर बाजारात लोकल सिताफळाची आवक ७० क्विंटलने घटून ३९३ क्विंटलवर आली; पण आवक कमी होऊनही सरासरी दरात तब्बल २ हजार रुपयांची भारी घसरण झाली आणि भाव ४ हजार रुपये प्रति क्विंटलवर आला. छत्रपती संभाजीनगर बाजारात आज ७३ क्विंटल सिताफळाची आवक झाली, तिथेही सरासरी दर २०० रुपयांनी घसरून ३ हजार ४५० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. तर, नाशिक बाजारात सर्वात कमी म्हणजे केवळ २८ क्विंटल आवक नोंदवली गेली, मात्र तिथे सरासरी दरात कोणताही बदल न होता ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव स्थिर राहिला. एकूणच काय तर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर बाजारांत सिताफळाचे भाव उतरल्याचे दिसून आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.